टाइम्स नाऊवर आशुतोष यांची बोलती बंद

0
807

टाइम्स नाऊ चे संपादक अर्णब गोस्वामी अँकरिंग करताना इतरांंना बोलूच देत नाहीत.विशेषतः कोणी अर्णबच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका मांडत असेल तर मग अर्णब त्याचा स्वर अधिकच चढा होतो. हा रोजचा अनुभव असतो.रजत शर्मा यांची आपकी अदालत पाहणाऱ्यांना अर्णबचा हा आक्रस्ताळेपणा नक्कीच आवडत नाही.तरीही न्यूज अवर हा टाइम्स नाऊवरील कार्यक्रमह हिट आहे.याचं कारण अर्णबचं बेधडक प्रश्न विचारणं, पुराव्यासह आपला मुद्दा मंाडणं हे लोकांना नक्कीच भावतं.अँकर म्हणून अर्णब याचं चर्चेवर पूर्ण नियंत्रण असतं ही बाब देखील महत्वाची असते.पॅनलवरील परस्पर विरोधी मतांच्या लोकांना थांबविणं हे साऱ्याच अँकरला जमतं असं नाही.अर्णब त्यात पारंगत असल्यानं इतर अनेकांप्रमाणेच मी देखील याच वेळेस मराठी वाहिन्यांवरील चर्चा सोडून बऱ्याचदा अर्णबचा कार्यक्रम पाहत असतो.सध्या अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी हे टार्गेट आहे.परवा त्यांनी कुमार विश्वास आणि नंतर आशुतोष यांची अशी काही भंबेरी उडविली की,दोघांनाही आपण का या चॅनलवर आलो असा प्रश्न नक्कीच पडला असले .
आशुतोष हे पुर्वाश्रमीचे पत्रकार.चांगले अँकर म्हणून त्यांचाही नाव लौकिकही होता.नंतर त्यांना पुढारीपणाचे डोहाळे लागले आणि ते आपचे पुढारी झाले.आपमध्ये सध्या जी यादवी चालू आहे त्यावरील कार्यक्रमात पक्षाची बाजू माडंण्यासाठी आशुतोष उपस्थित होते.अर्णब गोस्वामी यांनी आशुतोष यांच्यावर तोफा डागायला सुरूवात केल्यानंतर आशुतोष यांनी कारण नसताना टाइम्स नाऊ ने तत्वनिष्ठेचा जास्त आव आणू नये एका बॅकेची बातमी टाइम्स नाऊने कशी दडपविली याची माहिती द्यायला सुरूवात केली.आशुतोष यांच्या आरोपानंतर काही क्षणातच अर्णब गोस्वामी यांच्या टीमने ज्या बॅकेची बातमी दडपविल्याचा आरोप आशुतोष यांनी केला होता त्या बॅकेची बातमी दाखविल्याची क्लीप परत दाखवायला सुरूवात केली.यापुर्वी दाखविलेली ती बातमी पडद्यावर पाहून आशुतोष यांची बोलतीच बंद झाली.आपच्या नेत्यांना पुरावे नसताना दुसऱ्यावर आरोप करून संशय निर्माण कऱण्याची जुनी सवय आहे.त्याच पध्दतीनं आशुतोष यानी आरोप केला पण या चक्रात ते असे काही अडकले की,त्यांची केविलवाणी झालेली अवस्था प्रेक्षकांच्या नजरेतूनही सुटली नाही.काय करावं आणि काय बोलावं हे त्यांना समजेना झालं.थोडक्यात ते ब्लॅक झाले.त्यामुळे ते सारखी सारखी आपल्या चष्म्याची काच साफ करताना दिसले.कधी एकदाचा कार्यक्रम संपतोय आणि कधी आपली सुटका होतेय अशी त्यांची अवस्था झाल्याचं त्यांचा चेहरा सांगत होता.दुसऱ्या बाजुला अर्णबचे आशुतोष खोटा आरोप केल्याबद्दल चॅनलची माफी मागा,माफी मागा असा घोष सुरूच होता. अँकर म्हणून आशुतोष यांनीही अनेकांची अशीच फजिती केली असेल पण त्यांची भूमिका बदलली आणि तेही मग अशाच जाळ्यात अडकले.आशुतोषची झालेली ही अवस्था पाहताना नक्कीच वाईट वाटले पण त्यांनी स्वतःच ही ओढवून घेतलेली स्थिती होती.दोन आजी माजी पत्रकारांमधील हे शाब्दिक युद्ध पाहताना मजा आली हे नक्की.(SM)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here