चौपदरीकरण रखडले,पत्रकार भडकले

0
775

अलिबाग- कोकणाच्या विकासाच महामार्ग ठरू शकणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली काही दिवस ठप्प पडल्याने रायगडमधील जनतेत मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.

कोकणातील पत्रकारांनी सातत्यानं आंदोलन केल्यानंतर महामार्ग क्रमांक 17च्या चौपदरीकरणाचा निर्णय़ सरकारने घेतला.पहिल्या टप्पयात पळस्पे ते इंदापूर या 84 किलो मीटरच्या 900 कोटी रूपयांच्या प्रकल्पास मंजुरी दिली गेली.त्यानंतर काम सुरूही झाले.रस्त्याचे 33 टक्के काम पूर्ण झाल्याचे विधानसभेत सांगण्यात आले.मात्र आता काम अचानक बंद पडल्याने आणि सारा राडारोडा रस्तयावरच पडलेला असल्यानं अपघातांचे प्रमाण वाढले आहे.त्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.जून 2015पर्यत हे काम पूर्ण होते.
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंर्बईत राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गच्या आढावा बैठकीत नागपूर -रत्नागिरी या 10,000कोटीच्या नव्या महामार्गाच्या कामाला मंजुरी दिली असली तरी मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार याब्ददलचे स्पष्टीकरण दिले नाही.कोकणातल्या जनतेची ही फसवणूक असून भाजपने निवडणुकीपुर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करून तातडीने महामार्गाचे काम मार्गी लावावे अन्यथा पत्रकारांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख ,रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार आणि मराठी पत्रकार परिषदेेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here