स्व. चोपडे यांच्या कुटुंबियांना कल्याण निधीतून तीस हजारांची मदत

मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त एस.एम सरांच्या हस्ते धनादेश सपूर्द

——

बीड / प्रतिनिधी

जेष्ठ पत्रकार भास्कर चोपडे यांच्या निधनानंतर मराठी पत्रकार परिषदेने त्याच्या कुटुंबियांच्या पाठीशी भक्कम उभे आहे हे दाखवून दिले असून गुरूवारी मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते स्व. चोपडे यांच्या पत्नी सिंधुताई चोपडे यांच्याकडे तीस हजार रूपयांचा मदतीचा धनादेश बीड जिल्हा पत्रकार कल्याण निधीच्या माध्यामातून सपूर्द करण्यात आला.

मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सरचिटणीस भास्कर चोपडे यांचे मागील महिन्यामध्ये दुःखत निधन झाले. यापूर्वी त्यांच्या उपचारासाठी परिषदेने आर्थिक मदत केली पंरतू, त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. त्यांच्या निधनानंतर कुटुंबियांना धिर आणि आर्थिक मदत देण्याचे काम मराठी परिषद बीडने केले आहे. त्यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षण सुरू असून पैशाअभावी अडचण येवू नये म्हणून त्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च मराठी पत्रकार परिषद अंतर्गत बीड जिल्हा पत्रकार कल्याण निधीच्या माध्यामातून तीस हजार रूपयांचा धनादेश परिषदेचे विश्‍वस्त व पत्रकारांचे राज्याचे नेते एस.एम. देशमुख यांच्या हस्ते स्व. चोपडे यांच्या पत्नी सिंधुताई भास्कर चोपडे यांना सपूर्द करण्यात आला. यावेळी राज्याचे सरचिटणीस अनिल महाजन, जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, राज्य सदस्य विशाल सांळूके, जिल्हा सरचिटणीस विलास डोळसे, पत्रकार अधिस्विकृतीचे विभागीय सदस्य अनिल वाघमारे, संदिप बेदरे आदींची उपस्थिती होती.

———

एस.एम यांनी केले कौतूक

बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने अनेक नाविनपूर्ण उपक्रम आजपर्यंत राबविले आहेत. विशेष म्हणजे गेवराई, परळी, धारूर येथील दिवंगत पत्रकारांना आर्थिक मदत करून पत्रकाराच पत्रकारांच्या मदतीला येवू शकतात. आणि स्व. चोपडे यांच्या बाबतीमध्ये तर मदत करतांना केलेल्या चांगल्या कामाची महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांनी दखल घेतली. शेवटी पत्रकारांसाठी पत्रकारच मदतीला धावून येतात. हे बीडमधील परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी दाखवून दिल्याबद्दल मराठी पत्रकार परिषद बीडच्या जिल्हाध्यक्षसह सर्व पदाधिकारी व सदस्यांची एस.एम. देशमुख यांनी कौतूक केले.

——

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here