चॅनलमध्ये काय काय चालते, ऐका तनू शर्माच्या जबानी..

0
732

वाहिन्यांची झगमगती दुनिया वास्ववात किती काळीकुट्ट आहे याचं वर्णन तनू शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या जबानित कथन केलं आहे.इंडिया टीव्हीची पत्रकार तनू शर्मा यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल कऱण्यात आला आहे.आज त्यांनी पोलिसांना जबानी दिली.इंजिया टीव्हीमध्ये आपणास वारंवार चुकीची कामं करायला सांगितली जात होती.त्याला इन्कार केल्यानंतर आपल्याला मानसिक त्रास द्यायला सुरूवात झाली ङोती असं  तनू चं म्हणणं आहे.अनिता प्रसाद विष्ट आणि एमएनप्रसाद यांचा उल्लेख करून यांनी आपल्याकडून ज्या कामाची अपेक्षा केली होती ती रितू धवन यांच्या सल्ल्यानुसारच केली होती असेही  तनू चं म्हणणं आहे.

  तनू म्हणते,अनिता नेहमीच आपला चेहरा आणि शरिराची ताऱीफ करायची.ती म्हणायची   ‘you have got good assets, they are meant not to hide but to flaunt’।        अनिता हमेशा लोकांना भेटण्यासाठी रितूवर दबाव आणायची.आणि म्हणायची ‘start socializing, there is no harm in meeting big people, I have to send you somewhere’परंतू त्याला इन्कार केल्यानंतर त्रास सुरू झाला.अनिताच्या व्यवहाराची तक्रार तनू  ने जेव्हा वरिष्ठ प्रसाद यांना केली तेव्हा त्यांनीही अनिता जे सांगते त्यात गैर काय आहे असा प्रश्न केला.ते म्ङणायचे,पॉलिटिशियन आणि कॉर्पोरेटसं्‌ंकडं जाण्यात चुक काय आहे,एवढेच नव्हे तर प्रसादने एकदा आपल्याकडं असलेलं सुंदर शरीर स्क्रीनवर दाखविलं पाहिजे असंही म्हटल्याचं  तनू नं पोलिसांना सांगितलं आहे.अशा वातावरणानं त्रस्त झालेल्या  तनू नं आत्महत्येचा प्रय़त्न केला.या साऱ्या प्रकाराची चौकशी होण्याऐवजी  तनू च्याच विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.एखादया आम आदमीच्या विरोधात महिलेनं तक्रार केली तर त्याला सरळ उजलून आत टाकले जाते पण     तनू   शर्मा असेल किंवा प्रिती झिंटा असेल यांनी विनंयभंगाच्या तक्रारी केल्यानंतरही आरोपींवर अजून कारवाई होत नाही.याचा अर्थ कायदा सर्वांसाठी समान नाही हेच यातून दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here