ग्लोबल वॉर्मिंग चा जलचरावर परिणाम

0
1964

पृथ्वीवरील वाढत्या तापमानाचा (ग्लोबल वॉर्मिंग) परिणाम समुद्रातील सस्तन प्राण्यांवर होत असल्याचा निष्कर्ष गोव्याच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे मुख्य वैज्ञानिक प्रा.बबन इंगोले यांनी काढला आहे.रायगड जिल्हयातील रेवदंडा समुद्र किनार्‍यावर 42 फुटाचा महाकाय देवमासा गुरूवारी जखमी अवस्थेत आढळला.नंतर त्याचे निधनही झाले.रायगडच्या किनारपट्टी भागात गेल्या काही दिवसात डॉल्फिन, कासव ,मगरी आणि तत्सम सस्तन प्राणी मृतावस्थेत आढळत आहेत. काही दिवसापूर्वी मुरूडला दोन डॉल्फिन तसंच दोन महाकाय कासव  मृतावस्थेत सापडले तर महाडच्या नदीत दोन मगरीही अश्याचा स्थितीत आढळल्या.या संदर्भात इंगोले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हाणाले, या  घटना केवळ सागरी प्रदूषणाचा भाग नसून ग्लोबल वॉर्मिंगमुळे अश्या  घटना घडत असल्याचे इंगोले यांचे म्हणणे आहे.देवमासा समुद्र किनारी येऊन त्याचा मृत्यू होणे हे चिंताजनक आहे.त्याचा मृत्यू वय परत्वे नैसर्गिक होता की,अपघाती होता याचा शास्त्रीय अभ्यास होणे महत्वाचे असल्याचे मतही इंगोले यांनी व्यक्त केले आहे.सस्तन प्राण्यांवरील ग्लेबल वॉर्मिंगचे परिणाम समोर यायला वेळ लागतो.मात्र देवमासा,डॉल्फिन किंवा कासवांसारख्या पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील जलचरांच्या सातत्यानं होत असलेले मृत्यूची शासकीय स्तरावर गंभीर दखल आता  घेतली जाऊ लागली आहे.

दरम्यान रेवदंडा किनार्‍यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या देवमास्यावर वेळीच उपाय झाला असता तर देवमाश्याला जिवदान देता आले असते असे जलतज्ञांचे मत आहे.जखमी देवमास्यांसमवेत लोकांनी त्याच्या अंगावर उभे राहून फोटो काढले,त्यामुळे त्याची प्रकृत्ती अधिकच खराब होत गेल्याचाी तक्रार आता केली जात   आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here