मुकेश अंबानी यांचे दैनिक फर्स्ट पोस्ट लवकरच

मुंबईः ‘करलो मिडिया मुठ्ठी मे’ चे मिशन हाती घेऊन मिडियातील इलेक्टॉनिक आणि डिजिटल मिडियावर पूर्णपणे कब्जा केल्यानंतर आता मुकेश अंबानी प्रिन्ट मिडियात पदार्पण करीत असून फर्स्ट पोस्ट नावाचे एक इंग्रजी दैनिक लवकरच सुरू करण्यात येत असल्याची माहिती आहे.फर्स्ट पोस्ट नावाची एक बेवसाईट अंबानी यांची कंपनीच चालवत असून त्याच नावाचे दैनिकही सुरू केले जात आहे.फर्स्ट पोस्टची तयारी जोरात सुरू आहे.फर्स्ट पोस्टच्या माध्यमातून टाइम्स ऑफ इंडियाला टक्कर देण्याची योजना असल्याचे सांगितले जात आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकांपुर्वी फर्स्ट पोस्ट सुरू होईल असे नियोजन आहे.रिलायन्स ग्रुप आणि नेटवर्क 18 च्या माध्यमातून हे दैनिक चालविले जाणार आहे.या दैनिकाची सर्व जबाबदारी राहुल जोशी यांच्यावर सोपविली गेली आङे.राहुल जोशी हे नेटवर्क 18 चे काम पाहतात.फर्स्ट पोस्टसाठी पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचार्‍यांची भरती सुरू असून अंबानीचे वृत्तपत्र जॉईन करण्यासाठी वरिष्ठ मिडियाकर्मींची रांग लागल्याचे बोलले जाते.या नव्या दैनिकाच्या निमित्तानं राजकीय क्षेत्र आणि मिडियात मोठी उत्सुकता आहे.
देशातील 80 मिडिया पंधरा वीस भांडवलदारी कंपन्यांच्या हाती एकवटलेला आहे.त्यातही रिलायन्सचा वाटा मोठा आहे.त्यामुळं पुढील काळात जिल्हा आणि स्थानिक वृत्तपत्रांसमोर अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण होणार आहे.सरकार एकीकडं भांडवलदारी कंपन्यांना हरप्रकारची मदत करीत असून छोटया पत्रांची मुस्कटदाबी करीत आहे.मिडियाची एकाधिकारशाही ही केवळ माध्यमांसाठीच नाही तर देशातील लोकशाहीसाठी देखील धोक्याची घंटा असली तरी त्याकडं अजूनही कोणी गांभीर्यानं पहात नाही.या एकाधिकारशाहीचे दुष्परिणाम आणपणास येत्या काळात दिसायला लागणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here