संयुक्त महाराष्ट्रासाठी पत्रकार आचार्य अत्रे यांनी जिवाचं रान केलं.. अखेर या लढयात ते यशस्वी झाले… पण जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा कलश आला तेव्हा या लढ्यातील शिलेदार अत्रे कोठेच नव्हते .  एस एम देशमुखांची अवस्था आज आचार्य अत्रे यांच्यासारखीच झाली आहे.. ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळावी यासाठी हा माणूस गेली 23 वर्षे जिवाचं रान करून लढतो आहे.. त्यासाठी त्यानं अनेक अग्निदिव्य पार केली.. बडया पगाराच्या नोकरीवर पाणी सोडलं… कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं पण त्यांनी माघार घेतली नाही.. अखेर त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळं सरकारला पेन्शन योजना मंजूर करावी लागली.. आज म्हणे पहिल्या टप्प्यात २३ पत्रकारांना सन्मान योजनेची पत्रं आणि चेक दिले जाणार आहेत.. तो कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होत आहे.. मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण ना एस.एम.देशमुख यांना आहे ना या लढ्यातील त्यांच्या साथीदारांना… माहिती आणि जनसंपर्क विभागाचा हा शुध्द कृतघ्नपणा आहे.. “मला नाही बोलावलं तर हरकत नाही.. माझ्या पत्रकारांना पेन्शन मिळतेय ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे” .. ही एसेम यांची भावना आहे.. चळवळीतील नेतृतवाकडं दुर्लक्ष करायचं, त्यांना नैराश्य येईल असं वातावरण तयार करायचं आणि चळवळी मोडून काढायच्या असं सरकारचं धोरण असावं हे संताप आणणारं आहे.. अर्थात अशा घटनांनी विचलित होण्यासारखे एस.एम.देशमुख लेचेपेचे नाहीत..ते थकणार नाहीत, थांबणार नाहीत ते लढत राहणार आहेत.. आणि महाराष्ट्रातील तमाम पत्रकार त्यांच्या समवेत आहेत.. कारण एसेम सरांवर पत्रकारांचं केवळ प्रेमच नाही तर मोठा विश्वासही आहे हे सरकारी अधिकाऱ्यांनी विसरू नये……!
*बापूसाहेब गोरे*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here