मराठी पत्रकार परिषदेकडून निषेध

मुंबईः वादग्रस्त भाजप नेते राम कदम यांच्या कार्यकर्त्यांंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला फोन करून तेथील महिला पत्रकारांशी असभ्य आणि अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली.याचा मराठी पत्रकार परिषद तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने एस.एम.देशमुख यांनी तीव्र शब्दात धिक्कार केला आहे.
आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्यावर माझा विशेष कार्यक्रमात चर्चा करण्यात आली.या चर्चेत अविनाश अभ्यंकर सहभागी झाले होते.त्यांनी मत व्यक्त करताना शिविगाळ केली असा राम कदम यांच्या कार्यकर्त्यांंंंचा आक्षेप आहे.मात्र अशी शिविगाळ केली गेली नाही तर ही क्लीप मोडून तोडून व्हायरल केली जात असल्याचं चॅनलंचं म्हणणं आहे.त्यावरच आज राम कदम यांच्या कार्यकर्त्यांन एबीपी माझाला फोन करून महिला पत्रकारांशी अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी एबीपी माझाला दिलेल्या धमक्यांचा निषेध केला असून राम कदम यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.महाराष्ट्ातील पत्रकार अशा कोणत्याही धमक्यांना भीक घालणार नाहीत,राम कदम यांची मुजोरी अशीच चालू राहिली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं तर राज्यातील पत्रकारांना रस्त्यावर यावं लागेल असा इशाराही देशमुख यांन दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here