एनडीटीव्हीचे प्रसारण एक दिवस बंद

0
701

पठाणकोटवर जानेवारीत झालेल्या दहशवादी हल्ल्याचे थेट प्रसारण एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीला चांगलेच भोवले आहे. या प्रसारणाबाबत माहिती आण‌ि प्रसारण मंत्रालयाच्या मंत्रीगटाने केलेल्या विनंतीनंतर सरकारने एनडीटीव्ही इंडियाला एक दिवस प्रसारण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पठाणकोटच्या हवाई तळावर झालेल्या हल्ल्यादरम्यान एनडीटीव्हीने अत्यंत गोपनिय आण‌ि संवेदनशील माहिती प्रसारीत केल्याचा ठपका मंत्रीगटाने ठेवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एनडीटीव्हीला ९ नोव्हेंबरला मध्यरात्री १२ वाजल्यापासून १० नोव्हेंबरला मध्यरात्री १२ वाजेपर्यंत देशभरातील प्रसारण बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत एनडीटीव्हीने अद्याप कोणतीही प्रत‌क्रि‌यिा दिलेली नाही.

एनडीटीव्हीने प्रसारित केलेल्या संवेदनशील माहितीचा फायदा दहशतवाद्यांना होऊन केवळ देशाची सुरक्षाच नाही तर त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आण‌ि भारतीय जवानांच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकला असता. त्यासाठी वाहिनीला प्रसारण नियमाचा भंग केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यावर े ‘आम्ही दिलेली माहिती इंटरनेट आण‌ि वृत्तपत्रांनी यापूर्वीच प्रसिद्ध केलेली आहे,’ असे स्पष्ट‌ीकरण दिले होते. मात्र मंत्र‌ीगटाने एनडीटीव्हीने हल्ल्याच्या काळात दहशतवादी लपलेल्या ठिकाणाचा तपशील त्वरित दिल्याचे म्हटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here