एक्झीट पोलला बंदी

0
740

निवडणुकीचे ‘कव्हरेज’ करण्यासाठी प्रसारमाध्यमांमध्येही चुरस दिसत आहे . याच स्पर्धेविरुद्ध निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेत प्रसारमाध्यमांच्या ‘एक्झिट पोल’ला बंदी घातली आहे.
भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२0१४ साठी १२ मे २0१४ पर्यंत सायंकाळी ६.३0 या कालावधीत निवडणुकीचा ‘एक्झिट पोल’ (पूर्व चाचण्या) घेण्यास तसेच त्यासंदर्भात कोणत्याही प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमे तसेच अन्य कोणत्याही प्रसिद्धीमाध्यमांद्वारे तो प्रसिद्ध करण्यासंदर्भात बंदी घातली आहे. महाराष्ट्रात ३३ – रिसोड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक असल्याने त्या पोटनिवडणुकीसंदर्भात निवडणूकपूर्व चाचण्यांवरही वरील कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२0१४ तसेच ३३-रिसोड मतदारसंघाची पोटनिवडणूक यांच्या मतदान क्षेत्रात मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून निवडणूक निकालपूर्व चाचणी (ओपिनिअन पोल) किंवा निवडणुकीसंदर्भात इतर पाहणी (पोल सर्व्हे) तसेच निवडणुकीसंदर्भातील कोणतेही निवडणूक साहित्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित करण्यासही निवडणूक आयोगाने मनाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here