आम्हाला अभिमान आहे,जिगरबाज पत्रकारितेचा…

0
1012

अरूणा शानबागवर अत्याचार करून तिला जिवंतपणी मरण यातना भोगायला लावणारा सोहलाल वाल्मिकी गेल्या चाळीस वषार्ंपासून अज्ञातवासात होता.त्याच्या जिवंत असण्याबद्दल अनेक वावडया उठत होत्या.मात्र सकाळचे प्रतिनिधी ज्ञानेश चव्हाण यांनी सोहनलालचा शोध घेऊन त्याचा चेहरा प्रथमच जगासमोर आणला.हे काम जेवढं कठीण होतं तेवढंच धोक्याचंही होतं.युपीतील एका खेडयात दडी मारून बसलेल्या सोहनलालचा शोध घेताना कोणत्याही क्षणी काहीही प्रसंग येऊ शकत होता.मात्र हा सारा धोका पत्करून एका मराठी तरूणानं शोध पत्रकारितेचा आदशर् नमूनाच जगासमोर सादर केला.पत्रकारितेत कायर्रत असणाऱ्या सवार्ंसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.जे कोणालाही जमलं नाही ते एका मराठी पत्रकारानं करून दाखविलं आहे.त्याचा साथर् अभिमान आपणास असलाच पाहिजे. चव्हाणची ही स्टोरी नंतर एबीपी माझाचे कौस्तुभ फलटणकर यांनी लावून धरली आणि ती इलेक्टाॅनिक मिडियातूनही देशभर झळकली.दोघांची ही कामगिरी मराठी पत्रकारितेची पत आणि प्रतिष्ठा आणि दरारा वाढविणारी नक्कीच आहे.त्याबद्दल ज्ञानेश चव्हाण आणि कौस्तुभ फलटणकर यांचे अभिनंदन.

येत्या शनिवार,रविवारी मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन पिंपरी-चिचवडला होत आहे.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी सकाळी दहा वाजता अधिवेशनाचे उद्दघाटन होत आहे.त्याच वेळी ज्ञानेश चव्हाण आणि कौस्तुभ फलटणकर या दोन जिगरबाज मराठी पत्रकारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्ही सत्कार करीत आहोत.या संदभार्त सकाळचे संपादक संजय आवटे आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्याशी बोलणे झाले आहे.मराठी पत्रकार परिषदेनं नेहमीच सकारात्मक आणि विधायक पत्रकारितेला प्रोत्साहन दिले आहे .ज्ञानेश चव्हाण आणि कौस्तुभ फलटणकर यांच्या धाडसाचे मराठी पत्रकार परिषदेला कौतूक आहे आणि आम्हाला उभय पत्रकारांचा अभिमानही आहे म्हणूनच परिषदेने दोन्ही पत्रकारांना सन्मानित कऱण्याचा निणर्य घेतला आहे.मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मानीत होणाऱ्या पत्रकारांचे कौतूक पाहण्यासाठी पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही आग्रहाची विनती- एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here