देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीनं आम्हाला विचार स्वातंत्र्य,अभिव्यक्ती स्वातंत्र्य,लेखन स्वातंत्र्य दिलंय या भ्रमात आपण असाल आणि त्यातून निर्भयपणे व्यक्त होत असाल तर आपल्या या निर्भयपणाला आता ब्रेक लावावा लागेल.कारण आपल्याला आता व्यवस्थेच्या विरोधात मतं मांडता येणार नाहीत.

काही दिवसांपुर्वी नयनतारा सहगल यांना असा अनुभव आला.. निर्भिडपणा दाखविल्याने काही संपादकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या ,आता ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनाही हाच अनुभव आलाय.
अमोल पालेकर यांना परवा ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’मध्ये भाषण करायला बोलावलं होतं.मात्र त्यांनी आपल्या भाषणात सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणावर टीका केल्यामुळं अमोेल पालेकर यांना माध्येच थांबविलं गेलं..तुम्ही हे बोलू शकत नाही असं संयोजकांनी त्यांना सुनावले ..शिवाय आता भाषण आटोपतं घ्या असाही आदेश दिला गेला ..
.अश्या घटना आता अपवादात्मक राहिल्या नाहीत..सतत घडत आङेत..देशात अघोषित आणीबाणी आहे हे वेगळं सांगण्याची आता गरज नाही..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here