अलिबागमध्ये ग्रंथोत्सवाचे  आयोजन 

0
718
????????????????????????????????????
 
जीवन जगण्यासाठी जे जे महत्वाचे असते ते ते युुवकांनी वाचावे असे आवाहन कवी अशोक नायगावकर यांनी आज अलिबाग येथे केले.रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात नायगावकर बोलत होते.
नायगावकर म्हणाले,जीवन जगण्यासाठी विविध प्रकारचे ज्ञान,तंत्र आपल्याला आत्मसात करावे लागते.जीवन जगण्यासाठी जे लागते ते ग्रंथात असते त्यामुळं युवकांनी वाचनाची आवड जोपासली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
आज आणि उद्या असे दोन दिवस चालणार्‍या या ग्रंथोत्सवाची सुरूवात सकाळी सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीस्थळापासून काढण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीने झाली.अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते ग्रँथपुजन करून ग्रंथ दिंडीचा शुभारंभ करण्यात आला.शहाराच्या मध्यवस्तीतून ही ग्रंथ दिंडी जेएसएम कॉलेजमध्ये पोहचल्यनंतर नायगावकर यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उदघाटन झाले.यावेळी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here