अर्णब गोस्वामी यांनी का सोडलं ‘टाइम्स नाऊ’?

0
994

 बघा, ते काय म्हणाले ते..

संपादक कितीही प्रभावशाली असला तरी मालकांचे हितसंबंध धोक्यात आले रे आले की,त्याला बाहेरचा रस्ता दाखविला जातो.भारतीय मिडियात अशा अनेक संपादकांना याच कारणांसाठी आपल्या पदाचा राजीनामा तरी द्यावा लागला किंवा त्याला बाहेरचा रस्ता तरी दाखविला गेला.अर्णब गोस्वामी यांची कथा यापेक्षा वेगळी नाही.कधी काळी टाइम्स नाऊ वरून मोठ मोठ्या पुढार्‍यांना आणि प्रवक्त्यांना घाम फोडणारे अर्णब गोस्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.एवढंच कश्याला त्यांनीच उभ्या केलेल्या स्टुडिओत जाण्यापासूनही त्यांना रोखले गेले होते.स्वतः अर्णब गोस्वामी यांनीच दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना आपण टाइम्स नाऊ का सोडला यावरील पडदा दूर केला आहे.अर्णब म्हणतात.टाइम्स नाऊ सोडण्याच्या दोन दिवस अगोदरच मला प्रोग्राम करण्यापासून रोखले गेले होते.18 नोव्हेंबर 2016 हा अर्णब गोस्वामी यांचा टाइम्स नाऊमधील अखेरचा दिवस होता पण तत्पुर्वीच त्यांना तुम्ही प्रोग्राम करू शकत नाही असं बजावलं गेलं.’मी तयार केलेल्या स्टुडिओतच मला जायला बंदी घातली गेल्यानं मी कमालीची अस्वस्थ झालो’दुःखी झालो अशी खंत त्यानी व्यक्त केलीय..14 नोव्हेंबर रोजीच्या एका कार्यक्रमात बोलताना अर्णब म्हणाले होते की,नोटाबंदी नंतर लोकांना जंतर -मंतरवर बोलविण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी घेतला होता त्यापासून केजरीवाल यांना रोखले पाहिजे अशी सूचना अर्णब यांनी केली होती.ती महागात पडली अन त्यांना स्टुडिओ बंदी केली गेली.ते म्हणाले मी न धाबरता प्रश्‍न उपस्थित करतो.माझे मला मी स्वतंत्र केले आहे.मी मला खोटया मिडियापासून स्वतंत्र केलं आहे. मी मला समझोता कऱणार्‍या मिडियापासूून वेगळं केलं आहे.ते म्हणाले,माझी युवा टीम प्रश्‍न उपस्थित करीत राहिलंच.मला कुणाची गरज नाही,मला संरक्षणाचीही गरज नाही टाइम्स नाऊ सोडल्यानंतर त्यांनी ि’डिया व्हेंचर द रिपब्लिक सुरू करण्याचं ठरवलं आहे.रिपब्लिक 26 जानेवारीलाच लॉच होणार होतं  ते अजून सुरू झालेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here