Monday, June 14, 2021

३५ वर्षांनंतर करंजा-रेवस खाडी पूल उभारणीच्या मार्गावर

उरण ते अलिबाग दरम्यानच्या करंजा-रेवस खाडीवर पूल व्हावा याकरिता १९८० पासून राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असून राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी तशी घोषणाही केली होती. मात्र मागील ३५ वर्षांत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या संदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड व एमएमआरडीए यांच्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू असून, दोन किलोमीटर अंतराच्या या पुलासाठी सव्‍‌र्हेही करण्यात आला आहे. या पुलाची सुरुवात लवकरच होईल त्यासाठी बेल्जीयमच्या कंपनीला सव्‍‌र्हेचे काम देण्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत त्याचा अहवाल येणार आहे. ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेवस-करंजा पुलाच्या उभारणीची उरणकरांना आशा निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्य़ातील उरण व अलिबाग हे दोन्ही तालुके जिल्ह्य़ाची दोन टोके आहेत. या दोन तालुक्यापैकी अलिबाग तालुका हा रायगडची राजधानी आहे. या दोन्ही तालुक्यामध्ये रस्त्यामार्गे दोन ते अडीच तासाचे ७० किलोमीटरचे अंतर आहे. तर जलमार्गाने केवळ पंधरा मिनिटांचे रेवस ते करंजा अंतर आहे.
या दोन्ही प्रवासांपैकी एका प्रवासात वेळ आणि पैसा जादा गमवावा लागतो. तर दुसऱ्या प्रवासात समुद्राच्या लहरीपणाचा धोका पत्करून प्रवास करावा लागतो.
त्यामुळे या खाडीवर पूल उभारण्याची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या या पुलाची एकूण लांबी दोन किलोमीटर अंतराची आहे. तर एक किलोमीटर पुलाला जोडणारा रस्ता असणार आहे. या पुलाकरिता साधारणत ३०० कोटी रुपयांचा खर्च आपेक्षित आहे. पुलाच्या उभारणीमुळे या परिसरात येऊ घातलेल्या बंदरांच्या विकासाला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेत पुलाखालून मालवाहू जाहजे जाऊ शकतील इतक्या उंचीचा पूल बनविण्याचा प्रस्ताव आहे.
हा पूल झाल्यास उरणवरून अलिबागला अवघ्या तासभरात पोहोचता येणार आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्य़ातील मुरूड, श्रीवर्धन आदी ठिकाणच्या पर्यटनस्थळांवर जाण्याचेही अंतर कमी होणार आहे.
तसेच भविष्यात होऊ घातलेल्या न्हावा-शिवडी पुलामुळे मुंबई ते अलिबाग अंतरही कमी होणार आहे. या संदर्भात एमएमआरडीएचे मुख्य अभियंता एस. बी. तामसेकर यांच्याशी संपर्क साधला असता, पुलाच्या डीपीचे काम एका बेल्जियम कंपनीला देण्यात आले आहे. त्याचा अहवाल तीन महिन्यात येईल. त्यानंतर पुलाच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती ‘लोकसत्ता’शी बोलताना त्यांनी दिली.

 

Related Articles

वाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला

18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...

प़सिध्दी प्रमुख जाहीर

अ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...

पत्रकारांना लोकलची मुभा

"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,982FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

वाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला

18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...

प़सिध्दी प्रमुख जाहीर

अ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...

पत्रकारांना लोकलची मुभा

"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...

राजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती

अ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...

पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव

आता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान  सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन   मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...
error: Content is protected !!