बाबुराव पराडकरांवर लवकरच पुस्तक

0
794

कोकणची भूमी ही पत्रकारांसाठी पंढरी आहे.मराठी असेल ,हिंदी असेल किंवा बंगाली असेल या भाषेतले आद्य पत्रकार कोकणानं या देशाला दिले.दुदैवानं या पत्र महर्षिंची दखल समाजानं घ्यावी तेवढी घेतली नाही. मराठी पत्रकार परिषदेचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर ज्या पोंभुर्ले गावचे आहेत तिथं त्याचं चांगलं स्मारकही होऊ शकलं नाही.सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार परिषदेच्या अथक पाठपुराव्यामुळं आता सिंधुुदुर्ग नगरीत बाळशास्त्रीचं भव्य स्मारक होत आहे.मात्र त्यासाठी 175 वर्षे प्रतिक्षा करावी लागली.आता मराठी पत्रक ार परिषदेने हिंदी पत्रकारितेचे जनक बाबुराव विष्णू पराडकर यांच्या पराड या गावी स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.परिषदेच्या या प्रयत्नांना जेव्हा यश यायचं तेव्हा येईल मात्र किमान

हिंदी पत्रकारितेत पराडकर युग निर्माण कऱणार्‍या बाबूरावांचा नव्या पिढीला परिचय व्हावा यासाठीही तरी प्रयत्न होणं अपेक्षित होतं.त्यादृष्टीनंही काही प्रयत्न झाले नाहीत.काही वर्षापुर्वी बाबुराव पराडकर यांच्यावर लोकराज्यनं एक अंक काढला होता.त्यानंतर या अंगानंही प्रयत्न झाले नाहीत.त्यामुळं उत्तर भारतातील पत्रकार ज्या बाबुराव पराडकरांना दैवत मानतात त्या पराडकरांची ओळखही आपल्या नव्या पिढीतील किती पत्रकारांना आहे ते सांगता येत नाही.चूक त्यांची नाही त्यांच्याबद्दलचं साहित्य उपलब्धच करून दिलं गेलं नाही.मात्र आता ही अडचण दूर होत आहे.कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे याचं क्रांतिकारी पत्रकार बाबुराव विष्णू पराडकर हे पुस्तक आता प्रसिध्दीच्या मार्गावर आहे.बाबुरावांची सविस्तर माहिती मराठीतून देणारं हे पहिलं आणि एकमेव पुस्तक असणार आहे.गणेश मुळे सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी असताना त्यानी परिसराची भ्रमंती केली.बाबुरावांच्या कार्याची माहिती त्यांना मिळाल्यावर त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि आता ते पुस्तक रूपानं बाबुरावांना नव्या पिढीतील पत्रकारांसमोर उभं करीत आहेत.डॉ.गणेश मुळे हे मुळचे पत्रकार .त्यामुळं पत्रकारितेच्या अंगानं बाबूरावाच्या कार्याचा त्यांनी करून दिलेला परिचय नव्या पिढीच्या पत्रकाराना नक्कीच भावणार  आहे.त्यानी बनारस आणि अन्य ठिकाणी भ्रमंती करून,बाबूरावांची माहिती असलेल्या अनेक हिंदी भाषिक मान्यवरांशी चर्चा करून  हे पुस्तक तयार केलं आहे. त्यामुळं हे पुस्तक परिपूर्ण असणार यात शंका नाही..त्याचा मराठी पत्रकारांना नक्कीच उपयोग होणार आहे.या पुस्तकामुळं आमच्या स्मारकाच्या प्रकल्पाला देखील अधिक चालना मिळेल यात शंकाच नाही.डॉ.गणेश मुळे आपले आभार.’आपण एक ऐतिहासिक काम करीत आहात’.

डॉ,गणेश मुळे याचं माध्यमं आणि कायदा हे दुसरं पुस्तकंही छापायला जात आहे.बदनामीचा खटला एवढयाच एका कायद्याची आपणास जुजबी माहिती असते ,मात्र पत्रकारांना वारंवार आणि विविध कायद्याच्या भिती दाखवून पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातो.कोणते आहेत हे कायदे ते हे पुस्तक वाचून आपणास कळणार आहे.सर्वच पत्रकारांना या पुस्तकाचा उपयोग होणार आहे.डॉक्टर मुळे या कार्याबद्दल आपलं अभिनंदन आणि शुभेच्छा.आपलं दैनंदिन शासकीय कामकाज सांभाळून आपण हे दोन प्रकल्प मार्गी लावले आहेत ते पत्रकारितेचे विद्यार्थी तसेच पत्रकारांना नक्कीच उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here