पनवेल येथील महिला पत्रकार चेतना वावेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींना आज न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे.मुख्य आरोपी राजेश ठाकूरला कालच अटक करण्यात आली होती.त्याचा साथीदार चंद्रकांत पाटीलला आज सकाळी पकडण्यात आले.दोघांनाही आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याना एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.
दरम्यान महिला पत्रकारावर झालेल्या हल्लयाचा निषेध कऱण्यासाठी पनवेलमधील पत्रकारांनी सोमवारी बैठकीचे आयोजन केले असून पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस.एम.देशमुख बैठकीस मार्गदर्शन कऱणार आहेत.महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा करावा यामागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती गेली चार वर्षे लढा देत आहे.