स्टींग करणार्‍या पत्रकाराचे घर पाडले

0
831

उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांचे माजी स्वीय सचिव महंमद शाहिद मद्याचा परवाना देण्यासाठी लाचेची मागणी करत असल्याचे स्टींग ऑपरेशन करणार्‍या अशोक पांडे या पत्रकाराच्या घराचा काही भाग मसुरी-डेहराडून विकास प्राधिकरणाने पाडला आहे.पांडे यांच्या घराचे बांधकाम मंजूर आराखड्यानुसार नसल्याचे सांगत ही कारवाई केली गेली आहे.मात्र मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या अधिकारचे स्टींग ऑपरेशन केल्यानेच हा छळ सुरू असून आपल्या जिवाला धोका असल्याचे माझ्या जिवाला धोका असल्याचे पांडे यांनी म्हटले आहे.संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी आता हायकोर्टात धाव घेतली आहे.दरम्यान भ्रष्टाचारी अधिकार्‍याची चौकशी कऱण्याऐवजी सरकार भ्रष्टाचार उघड करणार्‍या पत्रकाराच्या मागे लागले आहे असा आरोप करून या प्रकऱणी सीबीआय चैकशी करावी मागणी उत्तराखंड विरोधी पक्षनेते अजय भट यांनी केली आङे.स्टींग ऑपरेशनमध्ये अडकलेले महंमद शाहीद हे गुजरात केडरचे 1998 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.गेल्या फेब्रुवारीमध्ये रावत मुख्यमंत्री झाल्यानंतर काही महिन्यातच ते प्रतिनियुक्तीवर उत्तराखंडमध्ये आले होते.सीडी प्रकऱणावरून भाजपने रावत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.(मटावरून साभार)

( ही बातमी वाचल्यानंतर मला अनिल कपूरच्या चित्रपटाची आठवण झाली.एका मुलाखतीच्या वेळेस तो मुख्यमत्र्यांना नागडे करतो.त्यानंतर संतापलेले मुख्यमत्री अगोदर त्याच्या घरची लाईट कापतात,फोन कापतात,नळ कापतात आणि मग घरही पाडतात.सिनेमातला हा प्रकार वास्तवातही घडतोय ही गोष्ट धक्कादायक नक्कीच आहे.सत्ताधारी कोणत्या थराला जाऊ शकतात आणि पत्रकारांवर कसे सूड उगवू शकतात याचं हे एक उदाहऱण आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here