सौदी अरेबियातील माध्यम जगतात काल रात्री एक चमत्कार घडला.एका महिला अँकरनं चक्क रात्रीच्या बातम्या दिल्या.सौदीमध्ये ही घटना ऐतिहासिक मानली जात आहे.हल्ली जगभर महिला अँकर पुरूष अँकरच्या तुलनेत जास्तच असतात.या विषयाचं अप्रुपही फारसं कोणाला वाटत नाही.सौदी अरेबियातही महिला अँकर नाहीत असं नाही.आहेत,पण त्या आतापर्यंत केवळ दिवसाच बातम्या देत होत्या मात्र काल रात्री सौदी टीव्ही या न्यूज चॅनलवर एका महिला अँकरनं आपल्या पुरूष साथीदारासह साडेनऊचे बुलेटिन सादर करून एक इतिहास रचला आहे.आज दिवसभर सौदी अरेबियात या विषयाची चर्चा सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here