मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया सेलच्या राज्य निमंत्रक पदी बापूसाहेब गोरे तर राज्य समन्वयक म्हणून अनिल वाघमारे यांची निवड जाहीर!

राज्यातील आठ हजार पत्रकारांचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेने राज्यातील वाढत्या सोशल मीडियाच्या समस्या,प्रश्नाची सोडवणूक व्हावी याउद्देशाने नव्याने मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाची स्थापना केली आहे.
सोशल मीडियाची संघटनात्मक बांधणी होण्यासाठी आज मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक मुंबईत परिषदेच्या कार्यालयात घेण्यात आली.यावेळी सर्वानुमते मराठी पत्रकार परिषद सोशल मिडिया सेलच्या राज्य निमंत्रक म्हणून बापूसाहेब गोरेराज्य समन्वयक म्हणून अनिल वाघमारे यांची निवड करण्यात आली.दोन्ही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले या सेल मध्ये राज्यपातळीवर आणखी पाच पदाधीकारी लवकरच नियूक्त केले जातील व जिल्हा निहाय निमंञक व सहनिमंञक नियूक्त केले जातील असे हि यावेळी जाहीर करण्यात आले .यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वत एस एम देशमुख, अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा,कार्याध्यक् गजानन नाईक,सरचिटणीस अनिल महाजन,कोषाध्यक्ष शरद पाबळे व राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY