तटकरे रायगडात कोणाला बरोबर घेणार ?

    0
    660

    रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उद्या मतदान होत आहे.स्वबळावर सत्ता स्थापन करण्याएवढंी सदस्य संख्या कोणत्याही एका पक्षाकडं नसल्यानं दोन किंवा तीन पक्षांना एकत्र येतच तिथं सत्ता स्थापन करावी लागणार आहे.उत्सुकता आहे ती,कोणते दोन पक्ष एकत्र येणार याची.रायगड जिल्हा परिषदेत पहिले अडिच वर्षे शेकाप-सेना युती होती.जयंत पाटील यांनी लोकसभेत शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याने ही युती तुटली.कोणत्याही परिस्थितीत शेकापबरोबर युती करायची नाही असा सेनेचा निर्धार आहे.सेना आणि शेकापही राष्ट्रवादीबरोबर युती कऱण्यास तयार असला तरी कोणाशी संग करायचा याचा निर्णय घेणं राष्ट्रवादीला कठीण जात आहे.शेकापबरोबर युती करायची तर महेंद्र दळवी यांना अध्यक्षपद देण्यास शेकापचा विरोध आहे.शिवसेनेबरोबर जायचे तर जातीयवादी पक्षाला मदत केली म्हणत विरोधक राज्यभर डांगोरा पिटत बसतील.सुनील तटकरे अशा कात्रित सापडले आहेत.शेकापला संपविण्याची ही चांगली संधी आहे असं तटकरे यांना वाटत असलं तरी शेकापला घेऊन श्रीवर्धनची विधानसभा सुरक्षित कऱण्याचा प्रयत्न ते करू शकतात.शेकापबरोबर युती झाली तर जिल्हा परिषद अध्यक्षपदही शुभदा तटकरे यांच्या रूपानं आपल्याच घरात येईल असंही तटकरे यांना वाटत आहे.मात्र असं झालं तर महेंद्र दळवी नाराज होतील.महेंद्र दळवी यांच्याकंड राष्ट्रवादीचे किमान सहा सदस्य आहेत.त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर मग राष्ट्रवादीसमोरच्या अढचणी वाढू शकतात.अध्यक्षपद मिळाले नाही तर दळवी राष्ट्रवादी सोडतील अशीही शक्यता आहे.त्यांच्याबरोबर अलिबाग तालुक्यातील अनेक राष्ट्रवादीचे कार्यकेर्ते पक्ष सोडून जाऊ शकतील असे झाले तर तो तटकरेंसाठी मोठा धक्का ठरेल तसेच विधानसभेसाठी मधू ठाकूरही अडचणीत येऊ शकतील.त्यामुळं उद्या काय होणार याकडं साऱ्या रायगडचं लक्ष लागून राहिलं आङे.रायगड जिल्हयात जिल्हा परिषद हा विषय नेहमीच स्फोटक राहिलेला आहे.यावेळेसही तशीच परिस्थिती असून सर्वत्र तणावही जाणवतोय.जिल्हा प्रशासनाच्याही ही गोष्ट लक्षात आल्यानं उद्या सकाळी 8 ते रात्री 8 पर्यत जिल्हा परिषद परिसरात 144 कलम लागू करण्यात आलं आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here