राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अद्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरातच बंडखोरी झाली असून त्याचे पुतणे संदीप तटकरे हे  शिवसेनेकडून  रोहा नागराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार असल्याने तटकरे यांच्या समोर पेच निर्माण झाला आहे . राष्ट्रवादी काँग्रेसने तटकरे यांचे व्याही संतोष पोटफोडे याना उमेदवारी दिली आहे . त्यामुळे संदीप तटकरे नाराज झाले आणि त्यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला आहे . तसेच विद्यमान  नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने राष्टवादी रोह्यात पेचात सापडली आहे . पक्षात खोपली ,मुरुड मध्ये ही बंडखोरी झाली आहे .

दरम्यान अर्ज मागे घेण्याची ११ तारीख शेवटची आहे. जिल्ह्यात १७१ जगासाठी ७७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या ९ जगासाठी ६२ अर्ज दाखल झाले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here