सावित्रीचे पाणी महाडमध्ये

0
754

 अलिबाग ( टीम बातमीदार )रायगड जिल्हयाला आज सलग पाचव्या दिवशी पावसानं झोडपून काढल्यानं जिल्हयातील जनजीवन विस्कळित झालंय.महाडमध्ये सावित्री,काळ आणि गांधारीला महापूर आले असून पुराचे पाणी महाड बाजारपेठेत घुसले आहे.नाते गावाला जाडणाऱ्या पुलावर पुराचे पाणी असल्यानं नाते आणि परिसरातील तीन गावांचा संपकर् तुटला आहे.

अबा नदी आज तिसऱ्या दिशीही धोक्याच्या पातळीवरून वहात आहे.पुरामुळे नागोठणे बाजारपेठेत आजही पाणी आहे.बस स्टॅन्डचा परिसरही जलमय झालेला आहे. एका इमारतीत अडकून पडलेल्या चौघाना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय.पाली-सुधागडला राष्ट्रीय महामागार्ला जोडणाऱ्या पुलावर नदीचे पाणी असल्यानं वाकण ते खोपोली रस्ता आज दुपारपासून बंद आहे. रोह्यात कुंडलिका देखील धोक्याच्या खुणेवरून वहात आहे.उल्हास नदीलाही मोठा पूर आल्याने कजर्त तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.दहीावली -नेरळ रस्ता बंद आहे.
महाड तालुक्यातील रायगड किल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीतील रस्त्याला भेगा पडल्याने ४० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलंय..येत्या २४ तासात जिल्हयात जोरदार पाऊस पडण्याची शक्याता असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here