अलिबाग- रायगड जिल्हयात सामाजिक बहिष्कारांच्या घटना सातत्यानं वाढत असून गेल्या दोन दिवसात अलिबाग आणि महाड येथे सामाजिक बहिष्काराच्या दोन घटना घडल्याने अशा प्रकारच्या घटनांची या वर्षातील संख्या 19 झाली आहे.
अलिबाग तालुक्यातील वरसोलीतील एका मंदिराच्या पुजाऱ्यावर जमिनीच्या वादातून गावकीनं बहिष्कार टाकला आहे.या प्रकरणाची पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे.महाड तालुक्यातील तेलंगे खेरवाडी येथेही एका कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.मुंबईतील खोली गावकीच्या नावावर करून देण्यास नकार दिल्याने हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.या प्रकरणात 29 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.रायगड जिल्हयात वाळित टाकण्यात आलेल्या कुटुंबांची संख्या शेकड्यात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

LEAVE A REPLY