अमेरिकेत अ‍ॅनापोलीस शहरातून प्रसिध्द होणार्‍या कॅपिटल गॅजेट या वृत्तपत्राच्या कार्यालयावर आज हल्ला केला गेला.त्यात पाच जणांचा बळी गेला आहे.हल्लेखोराचे नाव जॅरॉड वॉरेन रॅमोस असे आहे.या महाशयाच्या संदर्भात आलेल्या एका बातमीच्या विरोधात याने 2012 मध्ये संबंधित वृत्तपत्राच्या पत्रकाराच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.मात्र तो दावा हरला होता.त्याचा राग मनात धरून रॅमोसे यानं हा हल्ला केला.अर्थात आपल्याला हवं ते छापत नाहीत,किंवा वृत्तपत्राने आपल्या विरोधात बातमी छापली म्हणून पत्रकारांना जिवे मारण्याची ही पहिलीच घटना नाही.अशा घटना सातत्यानं घडत आहेत.2018 हे पत्रकारांसाठी अत्यंत धोकादायक वर्षे ठरलं असून या वर्षी जगात 47 पत्रकारांच्या हत्त्या झाल्या आहेत.रिपोर्टर विदाऊट बॉर्डरनं ही आकडेवारी प्रसिध्द केली आहे.
अफगाणीस्तानमध्ये पत्रकार सर्वाधिक धोकादायक स्थितीत आहेत.तेथे पहिल्या सहा महिन्यात थेट 11 पत्रकारांच्या हत्त्या झाल्या.जगातील 180 देशांमध्ये वर्ल्ड प्रेस फ्रिडम इंडेंक्समध्ये अफगाणचा क्रमांक 118 वा आहे.येथे सातत्यानं पत्रकारांच्या हत्या होताना दिसतात.त्यामुळं अनेक पत्रकार भितीच्या सावटाखाली जगत असतात. पत्रकारांच्या हत्येच्या बाबतीत सिरिया दुसर्‍या स्थानावर असून तेथे सहा पत्रकारांच्या हत्या झाल्या आहेत.त्यानंतर मेक्सिको,यमन,ब्राझिल आदि देशांचे नंबर लागतात.अर्थात भारतही याबाबतीत मागे नाही.भारतात गेल्या सहा महिन्यात तीन मान्यवर पत्रकारांच्या हत्त्या झाल्याची नोंद जागतिक पातळीवर घेतली गेलेली आहे.त्यामध्ये नवीन निश्‍चल हे दैनिक भास्करचे प्रतिनिधी 25 मार्च 2018 रोजी मारले गेले.न्यूज वर्ल्डचे संदीप शर्मा यांची 26 मार्च रोजी हत्या केली गेली.14 जून 2018 रोजी रायझिंग काश्मीरचे संपादक शूजात बुखारी यांची हत्या झाली आहे.. 1992 पासून आजपर्यंत जगभरात 1306 पत्रकार मारले गेले आहेत. सहा महिन्यात जगात 47 पत्रकारांच्या हत्त्या

LEAVE A REPLY