सरकार म्हणजे एखादी कंपनी आहे का ? की तिला आपण केलेल्या कामाची जाहिरात करावी लागते.सरकार ही कंपनी नसली तरी सरकारनं गेल्या दोन वर्षात जाहिरातीवर भरमसाठ खर्च केलेला आहे.आकडेवारी डोळे दिपवून टाकणारी आहे.2014-15 मध्ये 1190.53 कोटी रूपये सरकारनं केलेल्या कामाची जाहिरात करण्यासाठी घालविले.त्यात 2015-16 मध्ये आणखी 992.46 कोटी रूपये खर्च . दोन वर्षात सरकारनं 2182.99 कोटी रूपये खर्च केले.म्हणजे जाहिरातबाजीवर सरकार दररोज 3.25 कोटी रूपये खर्च करीत असते.ही रक्कम वर्तमानपत्रे आणि चॅनल्सला मिळाली आहे.तरीही भांडवलदारी पत्रे म्हणतात ,जाहिराती मिळत नाहीत.त्यांना ही रक्कम मिळाली नसेल तर मग गेली कुठं ? हा प्रश्‍नही आहेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here