लखनौ ः सत्य आणि जनहिताची बातमी प्रसिध्द करणं हा पत्रकारांचा धर्म आहे.कर्तव्यही आहे.मात्र पण सत्यावर आधारित ही पत्रकारिता अनेकांच्या हितसंबंधाआड येते त्यामुळं ती डोळ्यात खुपायला लागते.महाराष्ट्रात सत्य बातमी छापल्यामुळं अऩेक पत्रकारांवर हल्ले झाल्याची नोंद पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे आहे.पण उत्तर प्रदेशातून आलेली बातमी अधिक धक्कादायक आहे.सत्याचा आग्रह धरणारे सरकारचं सत्य बातमी छापणारया पत्रकारांना गजाआड करताना दिसत आहे.
ताज्या दोन घटना समोर आल्या आङेत.आजमगढमधील सरकारी शाळेतील मुलांना शाळेत झाडू मारायला भाग पाडले जात असल्याचा व्हिडीओ समोर आला.तो तयार करणार्‍या एका पत्रकारावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केलं आहे.दुसरी बातमी बिजनौरची आहे.सरकारी नळावर दलित परिवाराला पाणी भरण्यापासून रोखणार्‍या गावगुंडांचा व्हिडीओ आणि त्याची बातमी छापून आल्यानंतर सहा पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुलांना झाडू मारायला भाग पाडले गेल्याची बातमी सुधीर सिंह नामक पत्रकाराने प्रसिध्द केली .त्याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे आणि खंडणी मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनांमुळं उत्तर प्रदेशमधील पत्रकारांमध्ये मोठाच असंतोष आहे.

LEAVE A REPLY