आता पोलिस पाटलांची मदत 

0
745
“रायगडच्या जंगलात घुसलेले संशयित अतिरेकी नसून शिकारी” असल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केला असला तरी रायगडमधील पोलिस यंत्रणा मात्र संशयितांचा कसून शोध घेताना दिसत आहे.सशयिताना शोधण्यासाठी शिघ्रकृती दल आणि पोलिस कार्यरत असतानाच आता पोलिसांनी रोहा आणि मुरूडमधील पोलिस पाटलांची मदत घेणे सुरू केले आहे.रायगड पोलिसांनी काल मुरूड आणि रोह्यातील 108 पोलिस पाटलांची रोह्यात बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.अनोळखी फेरीवाले,सेल्समन किंवा गावात येणार्‍या कोणत्याही अनोळखी व्यक्तीची चौकशी करूनच त्याला गावात प्रवेश द्यावा अशा सूचना पोलिस पाटलांना देण्यात आल्या आहेत.दरम्यान ठाणे जिल्हयातील शहापूर येथे पकडलेल्या एका संशयिताची ओळख पटली असून त्याचे नाव शिशुकमार ढोले असे असून तो आसाममधील माजुली जिल्हयातील रहिवाशी आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here