एसेम देेशमुख गेली 35 वर्षे पत्रकारितेत सक्रीय आहेत.तालुका पातळीवरचा वार्ताहर ते मान्यवर दैनिकांचा दीर्घकाळ संपादक असा त्यांचा प्रवास झालेला आहे.मात्र देशमुखांची महाराष्ट्राला ओळख आहे ती,एक चवळवळ्या संपादक,पत्रकार म्हणूनच..केवळ पत्रकारांच्या हक्काच्याच नव्हे तर लोकहिताच्या अनेक चवळवळी उभ्या करून त्यांनी त्या यशस्वी करून दाखविल्या..ते जो विषय हाती घेतात तो यशस्वी करून दाखवितात म्हणूनच त्यांचे मित्र  त्यांना एस एम म्हणजे सक्सेस फुल मॅन म्हणून ओळखतात .मात्र त्यांच्यासाठी हा सारा लढा सोपा नव्हता..पत्रकारांसाठी ,लोकहितासाठी लढताना अनेक संकटं आली,नोकर्‍यांवर पाणी सोडावं लागलं,पण त्यांनी घेतलेला वसा सोडला नाही.पत्रकार पेन्शन हा विषय त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा होता,पत्रकार संरक्षण कायद्यासाठी त्यांनी जिवाचं रान केलं..अटका झाल्या,उपोषणं करावी लागली..त्यांना आलेले अनुभव विदारक होते..हे एसेम देशमुख यांच्याकडूनच ऐकण्यात  खरी गंमत आहे.पत्रकारांची चळवळ आज एका निर्णायक टप्प्यावर उभी असताना ही चळवळ ज्यांनी उभी केली ती समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे.म्हणूनच आम्ही एसेमसरांना बोलतं करणार आहोत…संवाद..एसेमसरांशी या कार्यक्रमात…

नांदेड अधिवेशनातील हा सर्वात महत्वाचा कार्यक्रम असणार आहे.

कार्यक्रम होईल रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9.30 वाजता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here