श्रीवर्धनमधून तटकरेऐवजी कोण?

0
869
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांन ी विधान परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ते विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत अशी चर्चा आता रायगडमध्ये सुरू झाली आहे.सुनील तटकरे निवडणूक लढविणार ऩसतील तर ते श्रीवर्धनमधून कोणाला तिकिट देतील याबद्दलही  वेगवेगळ्या नावांवर चर्चा सुरू झाली आहे.विविध वाहिन्यावरील सर्व्हेनुसार राज्यात राष्ट्रवादीची स्थिती फार चांगली  नाही.अशा स्थितीत प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांना आपल्या मतदार संघात अडकून पडायची वेळ येऊ नये त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करायला वेळ मिळावा यासाठी पक्षाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते.
सुनील तटकरे विधानसभेत श्रीवर्धन मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.लोकसभा निवडणुक त्यांनी रायगडमधून लढविली होती.त्यात त्यांचा निसटता पराभव झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here