श्रीला निरोप देण्यासाठी रायगड सज्ज

0
892
बाप्पाला निरोप देण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून रविवारच्या गणेश विसर्जनाच्या निमित्तानं अलिबागसह जिल्हयात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.रायगड जिल्हयात अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे उद्या 17 हजार 544 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे.गणेश विसर्जनामुळे समुद्रात होणारे प्रदूषण टाळण्यासाठी किनारपट्टीवर असलेल्या शहरातील बहुतेक नगरापालिकांनी विसर्जन हौद निर्माण केले असून भाविकांनी या हौदातच श्रीचे विसर्जन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.निर्मालय जमा कऱण्यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असल्याचे अलिबाग नगरपालिकेच्या सूत्रांनी सागितले.
दरम्यान गणपती विसर्जनानंतर चाकरमाण्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली असून रविवार आणि सोमवारी महामार्गावर 300 पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत.महामार्गावर बसविण्यात आलेल्या सीसी टीव्ही कॅमेर्‍याच्या मदतीने वरिष्ठ अधिकारी वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणार आहेत. मुंबईकडे जाणार्‍या भाविकांनी मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here