शिव-समर्थ स्मारकाचे जेएनपीटी येथे उद्दघाटन

0
706
अलिबागः जेएनपीटीच्या व्यापारवृध्दीमुळे राज्याच्या विकास दरात वाढ होत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फढणवीस यांनी रविवारी जेएनपीटी येथे व्यक्त केले.जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के योजनेतुन बांधण्यात आलेल्या शिव-समर्थ स्मारकाचे अनावरण काल ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी  यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबाधणी मंत्री नितीन गडकरी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते,रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जेएनपीटी मुंबई नेव्हिएशन चॅनेलच्या खोलीत वाढ करून 12500 पेक्षा अधिक टीईयू क्षमतेच्या नवीन जहाज हाताळणीसाठी सज्ज झालेल्या प्रकल्पाचे उद्दधाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले तर जेएनपीटी सेझ येथे मुक्त व्यापार वेअरहाऊस क्षेत्र विकास कामाचे भूमीपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.सागरमाला योजनेअंतर्गत देशात 16 लक्षकोटी रूपयांची गुंतवणूक होत असून त्यात महाराष्ट्रात तब्बल 114 प्रकल्पात 2 लाख 35 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.येत्या दोन वर्षात जेएनपीटीचा विकास होऊन तेथे नव्याने एक ते सव्वा लाख तरूणांना रोजगार मिळेल अशी माहिती अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.

????????????????????????????????????

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here