राष्ट्रवादीनं एका दगडात अनेक पक्षी मारलेत..पहिलं म्हणजे शिवसेनीची अशी फजिती केली की,या पक्षाला तोंड दाखवायला जागा राहू नये,शिवसेनेला भाजपपासून तोडण्यात यश मिळविलं एवढंच नव्हे तर एनडीएतून बाहेर काढलं.राष्ट्रवादीच्या या जाळ्यात सेना बरोबर अडकत गेली.परिणामतः सेनेची अवस्था तेल गेले,तुप गेले हाती धुपाटणे आले अशी झाली..राष्ट्रवादीवर विश्‍वास ठेवणं ही शिवसेनेची घोडचूक होती…

पोरकटपणा आणि फाजिल आत्मविश्वास असा की,राष्ट्रवादीचं किंवा कॉग्रेसचं पत्र हातात नसताना सेना नेते राजभवनात जातातच कसे ?,फॅक्स येईल मग दावा करू एवढा भाबडा आत्मविश्‍वास सेना कसा काय दाखवू शकते.? ‘आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे’ असे कॉग्रेस किंवा राष्ट्रवादीचे नेते एकदाही म्हणाले नसताना संजय राऊत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं वारंवार कश्याच्या जिवावर सांगत होते. ? दोन्ही कोंग्रेसवर विसंबुन सेना राजभवनावर गेली नसती तर आत्ता जेवढी फजिती झालीय ती झाली नसती..सेनेला हे काहीच दिसलं नाही..हातात पत्रं नसताना शिवसेनेचे आमदार एकमेकांना पुरणपोळ्या भरवत होते हे सारं परिपक्वपणाचं नव्हतंच..

शिवसेनेचे राजकारण पोरकटपणाचं होतं हे नक्की..आता सेना काय करेल ? …काही नाही करू शकत.कारण भाजपकडं जाण्याचे दोर कापलेत,गेले तरी लाचार होऊन जावं लागेल.राष्ट्रवादीला पाठिंबा दिला तर मुख्यमंत्रीपद तर मिळणारच नाही जे मिळेल त्यावर समाधान मानावं लागेल.म्हणजे कालपर्यंत जो पक्ष किंगमेकर होता तो आता अत्यंत दयनिय अवस्थेत पोहोचला आहे हे स्पष्टय..आता बातमी अशी आहे की,भाजप मुंबई मनपातील सेनेचा पाठिंबा काढून घेणार आङे.अशं झालं तर मग सेनेची जी कोंडी होईल त्याला पारावार उरणार नाही.एक शक्यता अशीही आहे की,उद्या दोन्ही कॉग्रेसची बैठक आहे.ते पुन्हा सेनेला पुढं करू शकतात.पण आपल्या अटी आणि शर्थी लादून..पण त्यांच्यावर विश्‍वास ठेवणं आणि त्यांच्यासमवेत सरकार चालविणं आता सेनेला अशक्य होणार आहे..

राष्ट्रवादीला आता राज्यपालांनी बोलावलं आहे.सध्याच्या घडामोडी बघता भाजप आणि राष्ट्रवादीची आघाडी ही शक्यता अनेकांना पटणारी नसली तरी ती होणारच नाही असा दावा करणं व्यर्थ आहे.राष्ट्रपती राजवट नको,किंवा राज्यातील राजकीय अस्थिरता संपविण्यासाठी ,शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही भाजपबरोबर युती करीत आहोत असं शरद पवार बिनदिक्कत सांगू शकतात..गरज म्हणून आणि शिवसेनेला अद्ला घडविण्यासाठी भाजप राष्ट्रवादीला जवळ करणारच नाही असं नाही.भाजपला कोणाचंही वावडं नाही हे अनेकदा सिध्द झालेलं आहे.

राहिला प्रश्‍न कॉग्रेसचा ..कॉग्रेसचा तथाकथित सोवळेपणा हा प

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here