मुंबईः पत्रकारांना वॉचडाँग म्हटलं जातं.मात्र आता या वॉचडॉगवर वॉच ठेवण्यासाठी देखील एक वॉचडॉग ग्रुप तयार झालाय.मिडियात ज्या कथित पक्षपाती बातम्या येतात,फेकन्यूज दिल्या जातात अशा बातम्यांवर वॉच ठेवण्यासाठी ‘इंडिया अगेन्स्ट बायस मिडिया’ या नावाची एक संघटना स्थापन झाली आहे.निवृत्त अभियंता विपूल सक्सेना आणि दिल्लीतील एक वकील विभोर आनंद हे या संघटनेचे संस्थापक आहेत.ही संघटना खोटया बातम्या देणार्‍या मिडियाच्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार आहे.जेएनयूमधील विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्यावरील हल्ल्यानंतर स्वरा भास्कर आणि धु्रव राठी यांनी व्यक्त केलेली राजकीय मतं आणि काही पत्रकारांनी या संदर्भात केलेलं ट्टिट या गोष्टींच्या विरोधात आता ही संघटना कायदेशीर कारवाई करणार आहे.
फेकन्यूजच्या संदर्भात जनमानसात मोठी नाराजी व्यक्त केली जाते.त्यांच्या भावनांची आम्ही दखल घेत त्याविरोधा कायदेशीर कारवाई करणार आहोत.मिडिया स्वतःला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणवून घेतो पण स्वतः कोणतंच जबाबदारी मानत नसल्याचं दिसतंय.मिडियाला आम्ही नियमानुसार,पुराव्यासह त्यांनी दिलेल्या बातम्या कश्या फेकन्यूज आहेत हे दाखवून देणार आहोत.त्याविरोधात न्यायालयातही न्याय मागितला जाणार आहे.मिडियाचं स्वातत्र्य म्हणजे कोणतीही जबाबदारी न घेता वाट्टेल ते दाखविण्याचं स्वातंत्र्य नाही असं या संघटनेच्या संस्थापकांनी एका संकेतस्थळास सांगितलं आहे.

LEAVE A REPLY