पत्रकारांनी देशाच्या शत्रूंचे इंटरव्हयू घ्यावेत ?

0
948

भारतातील वरिष्ठ मुक्त पत्रकार वेद प्रताप वैदिक यांनी पाकिस्तानचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी आणि 2008मधील मुंबई हल्ल्लयातील मास्टर माईंड तसेच जमात उद दावा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख ङाफिज सईद याची भेट घेतल्याची बातमी आल्याने देशभर खळबळ उडाली आहे.विशेषतः अफजल गुरूला अनेक वर्षे सांभाळणाऱ्या आणि अजमल कसाबचे सारे लाड पुरविणा़ऱ्या कॉग्रेसने मोठाच थयथयाट केला आहे.राज्यसभेतही हा मुद्दा उपस्थित करून गोंधळ घातला त्यामुळं राज्यसभा काही काळासाठी स्थगित ठेवावी लागली.वैदिक यांना अटक करावी अशी मागणीही कॉग्रेसच्या काही बोलभांड सदस्यांनी केलीय.

वैदिक यांनीच सईद हाफिज बरोबरचे फोटो सोशल मिडियावर टाक ले आहेत.ते म्हणतात आपण नवाज शरिफ यांची देखील भेट घेतली आहे.वैदिक सांगतात त्या प्रमाणे ते जर कोणाचे दूत म्हणून गेले नसतील तर त्यांनी पत्रकार म्हणून कोणाला भेटायचे हा त्यांचा विषय आहे. त्याबद्दल कोणाला कावकाव करण्याची गरज नाही.क्राईम बीट पाहणारे अनेक पत्रकार गुन्हेगारांच्या संपर्कात असतात.बातमी मिळविणे हाच त्यंाचा उद्देश असतो.विरप्पनच्या देखील काही पत्रकार संपर्कात होते आणि त्यांन अनेकदा सरकार आणि विरप्पन यांच्यात मध्यस्थी देखील केली होती.श्रीलंकेतील तामिळीचा नेता प्रभाकरण याच्याही मुलाखती मान्यवर नियतकालिकातून प्रसिध्द होत असत.अनेकदा नक्षली नेत्यांचे टेलिफोनीक इंटरह्यू देखील प्रसिध्‌ होत असतात.त्यामुळे वैदिक हाफिज याला भेटले असतील तर तो त्यांच्या व्यावसायिकतेचा भाग झाला.वैदिक हे केवळ बाबा रामदेव यांच्या जवळचे आहेत म्हणून बवाल उभा करायचा असेल तर हे राजकाऱण झाले.
आता पत्रकारांनी गुन्हेगारी जगतातील लोकांशी संपर्क ठेवायचा की नाही हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो.या चर्चेतही दोन बाजू असू शकतात.अंडरवर्ल्डमध्ये काय चालतंय हे शोधून काढण्यासाठी असे संपर्क ठेवावेच लागतात असं एका गटाचं म्हणणं आहे तर दुसऱ्या साधनशुचितेचा आग्रह धरणाऱ्यांना हे गैर वाटतं.अर्थात हा ज्याच्या त्याच्या समजुतीचा भाग झाला.परंतू आम्हाला असं वाटतं की,या मुद्दयावर सर्व पत्रकारांनी एकत्र बसून भूमिका नक्की केली पाहिजे.अंडरवर्ल्डच्या मुलाखती छायापच्यात की नाही,जे देशाचे शत्रू आहेत त्यंाचे इंटरव्हूय द्यायचे की नाहीत वगैरे.
आम्हाला हे प्रकरण आक्षेपार्ह याचसाठी वाटतंय की,वैदिक यांना आपण फार मोठा शेर मारल्याच्या थाटात हाफिज सईद याच्याबरोबरचा फोटो सोशल मिडियावर टाकण्याची काही गरज नव्हती.वैदिक यांनी सइदची मुलाखत घेतली असेल तर ती छापायला हरकत नव्हती.मात्र फोटो छापल्यानं कॉघ्रेसवाल्यांना दोन दिवस दळण दळायला एक विषय मिळाला एवढंच.यबाबात वैदिक म्हणतात,he met Saeed as a journalist and for a journalist no one is untouchable. 
वैदिक याचं नाव चर्चेत आल्यानं हे वैदिक कोण याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे.वैदिक हे राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जाताता,वेगवेगळ्या दैनिकात ते कॉलम लिहितात,प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियानं आपली हिंदी आवृत्ती भाषा सुरू केली तेव्हा वैदिक हे पाटीआयच्या हिंदी विभागाचे पहिले संपादक होते.त्यांनी नवभारत टाइम्समध्येही वरिष्ठ पदावर काम केले आहे.सध्या ते भारतीय भाषा संमेलन या संस्थेचे चेअरमन आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here