डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी आपल्या जीवनाची सुरूवात वृत्तपत्र विके्रेता म्हणून केली.नंतर ते विख्यात वैज्ञानिक आणि भारताचे राष्ट्रपती झाले.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजे 15 ऑक्टोबर हा दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून देशभर साजरा करण्यात येणार आहे.या वर्षीपासूनच हा उपक्रम सुरू केला जात आहे.
वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचण्याचे महत्वाचे कार्य करणार्या विक्रेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने यावर्षीपासून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्यानावाने राज्यातील एका वृत्तपत्र विक्रेत्यास पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.परिषदेने आज ही घोषणा केली आहे..दरवर्षी परिषदेच्यावतीने देण्यात येणा़र्या पुरस्कार वितरण सोहळ्यात या पुरस्काराचे देखील वितरण करण्यात येईल
पहिल्या वृत्तपत्र विक्रेते दिनानिमित्त मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी राज्यातील तमाम वृत्तपत्र विक्रेत्याना शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्या सरकारनं तातडीनं सोडवाव्यात अशी मागणी देखील देशमुख यांनी केली आहे.