माध्यमांचा आवाज बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात मोठ्या रक्कमांचे अब्रुनुकसानीचे दावे दाखल करायचे आणि त्यांची नाकेबंदी करायचा हा नवा ट्रेंड सध्या सुरू आहे.मध्यंतरी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या चिरंजीवांनी एक वेबसाईटच्या विरोधात शंभर कोटींचा खटला दाखल केला होता.आता अनिल अंबानी यांच्या रिलायन्सनं नॅशनव हेरॉल्डच्या विरोधात थोडा थोडका नव्हे तर तब्बल 5000 कोटींचा बदनामीचा दावा दाखल केलाय.आमच्या विरोधात बातम्या द्याल तर अशाच मोठ्या रक्कमेचे दावे दाखल केले जातील असा इशारा या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे.
नॅशनल हेरॉल्डनं राफेल सौद्याबाबत प्रसिध्द केलेल्या लेखाच्या विरोधात हा दावा दाखल केला गेला आहे.रिलायन्स डिफेन्स,रिलायन्स इन्फ्रास्टक्चर,आणि रिलायन्स एअरोस्ट्रक्चर या कंपन्याव्दारे हे दावे दाखल झाले आहेत.
नॅशनल हेरॉल्डचे प्रकाशक असोसिएट जर्नल लिमिटेड आण प्रभारी संपादक जफर आगा आणि ज्याींनी लेख लिहिलाय ते लेखक विश्‍वदीपक यांच्या विरोधात हा दावा आहे.न्या.पी.जे.तमाकुवाला यांच्या दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे खटले दाखल केले आहेत.न्यायालयाने हे खटले दाखल करून घेतले असून 7 सप्टेंबरपर्यंत उत्तर मागितले आहे.
नरेंद्र मोदी यांनी राफेल व्यवहाराची घोषणा केल्यानंतर अवघ्या दहा दिवसात अनिल अंबानी यांनी रिलायन्स डिफेन्स कंपनीची स्थापना केली असे नॅशनल हेरॉल्डच्या लेखात म्हटले होते.या लेखामुळं रिलायन्स समुह आणि अनिल अंबानी यांची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप या दाव्यात केला गेला आहे.

1 COMMENT

  1. काहीच गैर नाही ! मीडिया आजकाल ताळतंत्र सोडून कुणावरही बेछूट आरोप करीत सुटलाय ! बातम्यांचा उगम न पाहता बातम्या प्रकाशित करीत राहणे म्हणजे गोबेल्सनीती आहे हेही विसरून गेलाय हा मीडिया ! कुठेतरी गतीरोधक हवेच !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here