झी वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका राधिका कौशिक यांचा नोयडातील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.त्या झी राजस्थानमध्ये कामाला होत्या.हा अपघात आहे,राधिकानं आत्महत्या केली की,ही हत्या आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.
राधिकाचा सहकारी राहुल अवस्थीचे ग्रेटर नोयडामधील अंतरिक्ष फॉरेस्टमध्ये घर आहे.गुरूवारी राधिका त्याच्या घरी आली होती.तेथे दोघे दारू प्याले.दारू पिताना त्यांचे भाडण झाले त्यानंतर राधिका चौथ्या मजल्यावरून खाली पडली.पोलिसांनी अवस्थीची चौकशी केली तेव्हा ,राधिका पडली तेव्हा आपण बाथरूमध्ये गेलो होते असं त्यानं सांगितलं.पोलीस शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY