विष्णू बुरगे यांची भेट

0
764

लातूर येथील महाराष्ट्र वन चे विष्णू बुरगे यांची भेट घेऊन मराठी पञकार परीषदे कडून त्यांच्या खंबीर भुमीकेचे कौतूक
👉लातूर येथील महाराष्ट्र न्यूज वन चे प्रतीनीधी विष्णू बुरगे यांची भेट मराठी पञकार परीषदेचे नेते मा.श्री एस एम देशमूख यांच्या सांगण्या वरून विभागीय सचिव अनिल महाजन यांनी त्यांची भेट शनिवार दि 23 सप्टेंबर रोजी घेऊन पाशा पटेल यांच्या बरोबर घडलेल्या सर्व घटनाक्रमावर चर्चा केली या घटनेत पाशा पटेल सारख्या राजकीय सत्तेतील नेत्याची मस्ती उतरण्या साठी जी खंबीर भुमीका विष्णू बुरगे यांनी घेतली व राज्यात नवा पांयडा पाडला त्यांचे कौतूक परीषदेच्या वतीने करण्यात आले.या पुढे राज्यात पञकारा विरूध्द बोलण्याची हिंमत कोणी राजकारणी करणार नाही या साठी राज्यात या घटनेच्या संदेश प्रत्येक पञकारा पर्यंत पोहचवणार असल्याचे सांगण्यात आले .
मराठी पञकार परीषद व राज्यातील पञकार आपल्या पाठीशी उभे राहीले व मराठी पञकार परीषदेचे नेते एस एम देशमूख यांनी आपणास जी खंबीर साथ दिली त्य बद्दल,त्यांनी अभार व्यक्त केले.पञकाराच्या सहकार्यामुळे हा लढा आपण यशस्वी पणे लढू शकलो असे हि सांगीतले .
यावेळी सर्व समावेशक चर्चा झाली मराठी पञकार परीषद यापुढे हि सर्व सहकार्य करेल असे सांगीतले यावेळी मराठी पञकार परीषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सय्यद शाकेर व जेष्ठ संपादक नागनाथ सोनटक्के हे हि सोबत होते 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here