विलास तोकले यांना पुरस्कार

  0
  848

  बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार जाहिर

  विलास तोकले, धनंजय लांबे, सर्वोत्तम गावरस्कर, दगडू पुरी, रवी ऊबाळे पहिले मानकरी

  ——

  बीड ः प्रतिनिधी

  पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणार्‍या पत्रकार, संपादक आणि श्रमिक व युवा पत्रकारांसाठी देशातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे राज्य, मराठवाडा व जिल्हास्तरीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून पीटीआय या वृत्तसंस्थेचे उप निवासी संपादक विलास तोकले, पुढारीचे संपादक धनंजय लांबे, सुराज्यचे संपादक सर्वोत्तम गावरस्कर, चंपावतीपत्रचे दगडू पुरी आणि दिव्य मराठीचे रवी ऊबाळे हे बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

  पत्रकारितेला आपला धर्म मानून आहोरात्र त्यासाठी परिश्रम घेणार्‍या पत्रकारांचा येथोचित सन्मान मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यामातून केला जावा अशी संकल्पना परिषदेचे विश्‍वस्त तथा मार्गदर्शक एस.एम. देशमुख यांनी मांडली होती. त्यानुसार बीड जिल्हा पदाधिकार्‍यांनी या पुरस्काराचे नियोजन करत काही दिवसांपूर्वी नियोजन आणि निवड समिती स्थापन केली. कोणाचीही शिफारस अथवा अर्ज न घेता चांगल्या आणि कष्टकरी पत्रकारांचा सन्मान केला जावा आशा राज्यस्तर, मराठवाडास्तर आणि बीड जिल्हास्तर यामधून पुरस्कारासाठी पत्रकरांची नावे पुढे आली. त्यानुसार समितीने स्व. काकू-नाना स्मृति प्रित्यर्थ  देण्यात येणारा मराठवाडा स्तरावरील पुरस्कार पुढारीच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक धनंजय लांबे यांना घोषित करण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री स्व. सुंदरराव सोळंके यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राज्यस्तरावरचा पुरस्कार पीटीआय या वृत्तसंस्थेचे निवासी उपसंपादक विलास तोकले यांना देण्याचे ठरले. ते मुळ बीड जिल्ह्याचेच रहिवाशी आहेत. हाबाडा फेम स्व. बाबूराव आडसकर स्मृति प्रित्यर्थ पुरस्कार सुराज्यचे संपादक सर्वोत्तम गावरस्कर, शिक्षणाबरोबरोच शेती आणि कुटुंब वत्सल व्यक्तीमत्व म्हणून ओळख असलेले प्रभाकरराव कुलकर्णी यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा श्रमिक पत्रकारिता पुरस्कार चंपावतीपत्रचे दगडू पुरी यांना जाहिर करण्यात आला तर सर्वांना आपले वाटणारे परंतु ते आता आपल्या क्षेत्रातच नव्हे तर जगात नसलले स्व. भास्कराव चोपडे यांच्या नावे दिल्या जाणार्‍या युवा पुरस्कारासाठी दिव्य मराठीचे रवी ऊबाळे यांना जाहिर करण्यात आला आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शालश्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कार वितरण सोहळा लवकरच राज्यातील मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे.

  • मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त व मार्गदर्शक एस.एम. देशमुख यांच्या आध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, राज्य सरचिटणीस अनिल महाजन, जिल्हा सरचिटणीस विलास डोळसे, राज्य सदस्य विशाल सांळूके, अधिस्विकृती समितीचे सदस्य अनिल वाघमारे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here