कंत्राटासाठी रामशेठ यांचे पक्षांतर

0
739

पनवेलनजिक उलवे येथील रामशेठ ठाकूर स्पोर्ट कॉम्प्लेक्सकरिता सिडकोनं दिलेली वाढीव जमिन तसेच कळंबोली येथील पार्किंग करिता टीआयपीएल कंपनीला कवडीमोल दराने देण्यात आलेल्या कंत्राटाबद्दल कॅेगच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलेला असल्यानं रामशेठ ठाकूर याना भाजपमध्ये प्रवेश देणार काय असा प्रश्न शेकापचे उरणचे आमदार विवेक पाटील यांनी काल पनवेल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत विचारला आहे.

रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर आज नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.या पार्श्वभूमीवर काल विवेक पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती.प्रशांत ठाकू र यांनी सत्ताधारी कॉग्रेस पक्षाचे आमदार म्हणून आपल्या सत्तेचा दुरूपयोग केल्याचा आरोपही ठाकूर पिता-पूत्रांवर केला आहे.विमानतळाचे कंत्राट मिळावे यासाठीच ठाकूर पिता-पूत्रांचे पक्षांतर असल्याचा आरोपही विवेक पाटील यांनी केलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here