विधिमंडळाचे कामकाज पाहण्याची मराठी पत्रकार परिषदेच्या सदस्यांना संधी

मराठी पत्रकार परिषद आणि वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्यावतीने मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न जिल्हा पत्रकार संघांच्या सदस्यांसाठी 24 मार्च 2017 रोजी एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं आहे.मुंबईतील विधान भवनाच्या इमारतीत होणार्‍या या वर्गासाठी पहिल्या टप्प्यात रायगड,ठाणे,पालघर,नाशिक,आणि पुणे जिल्हयातील प्रत्येकी दहा पत्रकारांची निवड केली जाईल.राज्याच्या अन्य जिल्हयातून काही पत्रकारांना या प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहण्याची इच्छा असेल तर त्यांचाही विचार केला जाऊ शकेल.या शिबिरासाठी उपस्थित राहू इच्छिणार्‍या पत्रकारांना 23 मार्च रोजीच मुंबई उपस्थित राहावे लागेल.24 तारखेला सकाळी 9 वाजता सर्व पत्रकार विधान भवन परिसरात हजर होतील.मुंबईत येणार्‍या पत्रकारांची निवास व्यवस्था स्वतःलाच करावी लागेल.दुपारच्या भोजणाची व्यवस्था वि.स.पागे अध्यासनामार्फत केली जाईल.या प्रशिक्षण वर्गात हक्कभंग म्हणजे काय,औचित्याचा मुद्दा,तारांकित प्रश्‍न,प्रश्‍न राखून ठेवणे या अणि  पत्रकारांना रोज ज्या परिभाषेचा उपयोग करावा लागतो  अशा बाबीची   माहिती दिली जाणार आहे. तसेच सभागृह सदस्यांचे विशेषाधिकार,विधिमंडळ कामकाज आणि प्रसिध्दी माध्यमं आदि विषयांवर मान्यवर वक्ते पत्रकारांना माहिती देणार आहेत.या शिवाय विधानसभा आणि विधान परिषदेच्या प्रेस गॅलरीत जाऊन तेथील कामकाज पाहण्याची संधी देखील पत्रकारांना उपलब्ध होणार आहे.आपल्यापैकी अनेकांनी विधान भवनच पाहिलेले नाही.आमदार कुठे बसतात,तेथील कामकाज कसे चालते हे केवळ टीव्हीत पाहूनच आपणास माहिती असते मात्र वि.स.पागे अध्यासनाचे संचालक निलेश मदाने यांच्या सहकार्‍याने आपणास या सर्व संधी उपलब्ध होणार असल्याने मराठी पत्रकार परिषदेच्या सदस्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.वर्गासाठी उपस्थित राहणारे पत्रकार वार्ताकनाचे काम कऱण्याशी किवा संपादनाशी निगडीत असावेत अशी अपेक्षा आहे.पहिल्या टप्प्यात केवळ पन्नास पत्रकारांनाच या संधीचा लाभ घेता येणार आहे.मराठी पत्रकार परिषदेशी जोडल्या गेलेल्या पत्रकारांना विनंती करण्यात येत आहे की,या संधीचा त्यांनी जरूर लाभ घ्यावा आणि विधान भवनाच्या कार्याची माहिती जाणून घ्यावी. जे पत्रकार या प्रशिक्षण वर्गात सहभागी होऊ इच्छितात अशा पत्रकारांनी आपली नावं उशिरात उशिरा 29 मार्च पुर्वी आपल्या जिल्हयातील अध्यक्षांमार्फत किंवा थेट एस.एम.देशमुख अथवा किरण नाईक यांना कळवावीत.पासेस वगैरेंच्या पुर्तेतेसाठी ही नावं अगोदर कळवावी लागतील.ऐनवेळी आलेल्या कोणाचाही विचार केला जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद ध्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here