विजय… पत्रकारांच्या एकजुटीचा..

अलिबागचे पत्रकार हर्षद कशाळकर यांच्यावर आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले.. जयंत पाटील यांना अपेक्षित नसलेली एकजूट दाखवत आम्ही भाईगिरी खपवून घेणार नाही हे रायगडच्या आणि राज्यातील पत्रकारांनी दाखवून दिले…पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने निवेदनाव्दारे या विषयाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष्य वेधले.. राज्यातील पत्रकारांच्या तीव्र भावना लक्ष्यात घेत मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश रायगडच्या एस. पीं. ना दिले आहेत.. हा पत्रकारांच्या एकजुटीचा विजय आहे..
इथं आणखी एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करावा लागेल.. लोकसत्ता खंबीरपणे हर्षदच्या पाठिशी उभे राहिल्याचे दिसते..साधारणतः पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर त्याला वयसथापकांकडून वारयावर सोडले जायचे.. त्यामुळे पत्रकार सैरभैर व्हायचे..व्यवस्थापनाच्या मानसिकतेतील या बदलाचे देखील स्वागत करावे लागेल.. चळवळीचे हे यश आहे यात शंका नाही..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here