Saturday, May 15, 2021

माध्यमांची जबाबदारी वाढली – डॉ. सिंग

लोकमतच्या शतक महोत्सवी वर्षाच्या लोगोचे अनावरण
नवी दिल्ली : लोकशाहीत प्रसारमाध्यमांची मोठी जबाबदारी आहे. वर्तमान परिस्थितीत ही जबाबदारी अजून वाढलीच आहे, अशी भावना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी नेत्यांच्या बैठकीचा संदर्भ देत मनमोहनसिंग यांच्या राष्टÑनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह लावले होते. त्या पार्श्वभूमीवर डॉ. सिंग माध्यमांच्या कार्यक्रमात काय बोलतात, याकडे उपस्थित सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र त्या वादाचा उल्लेखही न करता डॉ. सिंग यांनी माध्यमांनी सत्याची कास धरावी असे आवाहन केले.
‘लोकमत’ शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. त्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या विशेष बोधचिन्हाचे अनावरण डॉ. सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, लोकमतने राष्टÑजीवनाच्या उभारणीत भरीव योगदान दिले आहे.
हेच योगदान भविष्यातही देण्याचे आवाहन त्यांनी केले. एका अमेरिकन पत्रकाराचा संदर्भ देत ते म्हणाले की, कोणत्याही बातमीच्या मागे दडलेले सत्य हे कधीच समोर आणल्याशिवाय कळत नाही, माध्यमांनी ते सत्य समोर आणण्याचे मोठे काम तटस्थपणे केले पाहिजे. ते करत असताना, त्याच्या बातम्या देत असताना त्यात त्यांनी आपली मत मतांतरे आणू नयेत. लोकमतने सत्य समोर आणण्यासाठीचे काम याच तटस्थपणे यापुढे ही चालू ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.
देशातील प्रतिष्ठित दैनिक लोकमत आता राष्टÑीय राजधानीतून प्रकाशित होणार, ही अभिनामाची बाब आहे, असे सांगून डॉ. सिंग म्हणाले की, पत्रकारितेची मूल्ये रुजवण्यासाठी लोकमतने सदैव पुढाकार घेतला आहे. दिल्लीत पदार्पण केल्याने लोकमतची जबाबदारी अजूनही वाढली (lokmat varun sabhar )

Related Articles

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,960FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

वेदनेचा हुंकार

वेदनेचा हुंकार एक मे हा दिवस प्रचंड तणावात गेला.. तणाव उपोषणाचा किंवा आत्मक्लेषाचा नव्हताच.. मोठ्या हिंमतीनं, निर्धारानं अशी शेकड्यांनी आंदोलनं केलीत आपण.. ती यशस्वीही केलीत.....

पुन्हा तोंडाला पाने पुसली

सरकारने पत्रकारांच्या तोंडाला पुन्हा पुसली मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये होईल अशी जोरदार चर्चा मुंबईत होती पण...
error: Content is protected !!