वर्तमानपत्रं वाचू नका,टीव्ही पाहू नका. राष्ट्रवादीच्या आमदाराचा फतवा

0
839

वाहिन्यावरील सत्य विश्लेषण किंवा वर्तमानपत्रातील सत्य बातमीही आपल्या विरोधात जाणारी असेल तर ती कोणत्याच राजकीय नेत्यांना आवडत नाही.ते भडकतात,माध्यमांवर हल्ले करतात.माजलगावचे आमदार, माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी आता वेगळाच मार्ग अवलंबिला आहे.सातत्यानं आपल्या विरोधात बातम्या येत असल्याने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यंाऩी वर्तमानपत्रंच वाचू नयेत असे आदेशच आता आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.याचा माजलगाव तालुका पत्रकार संघाने निषेध केला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनेही या आमदार सोळंकेच्या या वक्तव्याचा प्रखर शब्दात निषेध केला असून हा प्रकार लोकशाहीतल्या चौथ्या स्तंभाचा आवाज घोटण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.माहिती जाणून घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे,वर्तमानपत्रांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करून आ.सोळंके सामांन्यांचा हा अधिकारच हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.लोकशाही आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर श्रध्दा असणाऱ्या प्रत्येकाने अशा वक्तव्याचा निषेधच केला पाहिजे.
बीड लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारासाठी माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव,भाटवडगाव आदि ठिकाणी 23 तारखेला   सभा घेण्यात आल्या.या सभांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला.त्यामुळे अस्वस्थ झालेल्या सोळंके यांनी आपला संताप माध्यमांवर काढला. या सभेत बोलताना प्रकाश सोळंके यांनी कोका-कोला आणि कोलगेटच्या जाहिराती प्रमाणे इलेक्ट्रॉनिक मिडियावाले 24 तास मोदी पुराण लावतात तर वर्तमानपत्रांना गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोशिवाय काहीच दिसत नाही.हे सारे पाहिल्यानतर डोके काम करेनासे झाले आहे.तेव्हा किमान 17 एप्रिलपर्यत टीव्ही पाहणे आणि वर्तमानपत्रं वाचनं बंद केलं पाहिजे असे आवाहनच सोळंके यांनीआपल्या समर्थकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here