लोणार इथंही होतंय पत्रकार भवन

0
707

मुळशी.वडवणी आणि आता लोणार.प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन उभं राहिलं पाहिजे हा आमचा प्रयत्न हळू हळू यशस्वी होताना दिसतो आहे.पुणे जिल्हयातील मुळशीचं पत्रकार भवन बांधून पूर्ण होत आलंय,वडवणीत उद्या पायाभरणी आहे आणि आता बुलढाणा जिल्हयातील लोणार या ऐतिहासिक सरोवराचं स्थळ असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी देखील स्थानिक पत्रकारांनी पत्रकार भवन उभारण्याची तयारी केली आहे.लोणार तालुका पत्रकार संघाला पत्रकार भवनासाठी तब्बल अर्धा एकर जागा मिळाली आहे.त्या जागेवर आता पत्रकार भवनाची भव्य वास्तू उभी कऱण्याचा संकल्प स्थानिक पत्रकारांनी सोडला आहे.त्यासाठी शहर आणि तालुक्यातील पन्नास पत्रकार एकत्र येत त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचं ठरविलं आहे.येत्या 5 सप्टेंबर रोजी म्हणजे शिक्षक दिनाच्या दिवशी पत्रकार भवनाच्या वास्तूचा पायाभऱणी समारंभ आयोजित करण्यात आला आहे.त्यासाठी मी लोणारला जाणार आहे. लोणारच्या सर्व पत्रकार मित्रांना मी या निमित्तानं शूभेच्छा देत आहे.

अन्य तालुक्यातील पत्रकारांनी देखील असा प्रय़त्न कऱण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here