पत्रकारांच्या आणि व्हीडीओ जर्नालिस्टच्या सुरक्षेच्या मुद्यावरून लालबागच्या राजाच्या कव्हरेज संदर्भात मागच्या वेळेस टीवीजेएने एक भूमिका घेतली होती. ती आजही कायम आहे. मागच्या वेळी सर्व ब्युरोहेडस आणि टीवीजेए यांची बेठक झाली होती. त्यात लागबागच्या राजाचे कव्हेरज करू नये असे ठरले होते. जे कव्हर करतील त्यांना त्यांना आपण रोखू शकत नाही, पण आपण एकत्र येउन आपल्या सुरक्षेच्या संदर्भात लोकशाहीच्या मार्गानं पाउल उचलण्याची ती वेळ होती. त्यावेळी सर्वांनी एकजूट दाखवली त्याबद्दल धन्यवाद.
या वर्षीही टीवीजेएची मागचीच भूमिका कायम राहील. आपले निमंत्रित सदस्य किंवा इतर सदस्यांनी लालबागच्या राजाच्या कव्हेज संदर्भात लिखित मुद्दा उपस्थित केला नाही. महत्वाचे लालबागच्या राजाच्या मंडळाच्या वतीने साळवे यांनी तोंडी स्वरूपात चर्चा करण्याचे म्हटले होते. त्यांना मी रितसर चर्चेसाठी पत्र द्या अशी विनंती केली होती. पण त्यांनी किंवा अन्य कुणीही लिखित चर्चेचे पत्र दिले नाही.
या संदर्भात निमंत्रित सदस्या किंवा ब्युरोहेड यांच्याकडूनही कोणतीही सूचना आली नाही. त्यामुळे टीवीजेए ची गेल्या वेळची भूमिका कायम ठेवण्यात येत आहे.
या नंतरही कुणा निमंत्रित सदस्यास चर्चा करायची असेल किंवा लालबागच्या राजाकडून अधिकुत पत्र आले तर चर्चेचं व्यासपीठ खुलं राहील.
आणि निर्णयही…
आपला स्नेहांकीत
विलास आठवले
अध्यक्ष टीवीजेए