लातूरमध्ये पत्रकारास मारहाण

  0
  1808

  लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष
  नृसिंह घोणे यांना पोलिसांची मारहाण

  उदगीर:- लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अधक्ष नरसिंग घोणे याना मंगळवारी 24 मार्च रोजी लातूर येथील शिवाजी चौकातुन कार्यालयात जात असताना लातूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे व उपस्थीत पोलीस कर्मचारयानी अमानुष मारहाण केली. त्याचा उदगीर येथील पत्रकारानी निषेध केला आहे.. गृहमंत्री व संबंधिताना निवेदन देऊन कार्यवाही व निलंबनाची मागणी केली आहे
  एकीकडे पंतप्रधान पत्रकाराचे कौतुक करतात,दुसरी कडे माहिती व प्रसारन मंत्री प्रकाश जावडेकर पत्रकारास माराल तर कार्यवाही करु म्हणत असताना लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अधक्ष नरसिंग घोणे याना लातूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे व उपस्थीत पोलीसानी अमानुष मारहाण केली एवढेच नाही तर का मारले असे फोन लाऊन विचारनारया सम्पादकास उपविभागीय पोलीस अधिकारयानी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. सचिन सांगळे व मारहाण करनारया पोलीसावर कार्यवाही करुण त्वरित त्यांना निलंबित करावे अशी उदगीर येथील उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांच्या मार्फत गृहमंत्री अनिल देशमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पोलीस महासंचालक मुंबई ,विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड़,राजेंद्र माने पोलीस अधिक्षक लातूर यांच्याकडे करण्यात आली आहे..
  मराठी पत्रकार परिषदेने या घटनेचा निषेध केला आहे..

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here