लाइव्ह कार्यक्रमात महिलेनं पत्रकाराला फटकावलं

0
1128

बीबीसीच्या एका पत्रकाराला चॅनेलवर लाइव्ह शो सुरू असतानाच एका महिलेचा मार खावा लागला. त्याला कारणही तसच होतं. बीबीसीच्या लाइव्ह कार्यक्रमातच या पत्रकाराने महिलेच्या वक्षस्थळांना चुकून स्पर्श केला अन् त्याला भर कार्यक्रमात स्वत:चीच शोभा करून घ्यावी लागली.

बेन ब्राऊन असे या पत्रकाराचं नाव आहे. ते बीबीसीचे सहाय्यक राजकीय संपादक नॉर्मन स्मिथ यांची मुलाखत घेत होते. रस्त्यावरच स्मिथ यांची ऑन कॅमेरा मुलाखत सुरू होती. यावेळी एक महिला त्यांच्या दिशेने चालत आली. त्यानंतर या महिलेने कॅमेऱ्याकडे बघत बेन यांना अंगठा दाखवत त्यांचं अभिनंदनही केलं. त्यामुळे कार्यक्रमात व्यत्यय येत होता. तिला बाजूला हटण्यास सांगूनही ती बाजूला होत नव्हती. हा कार्यक्रम लाइव्ह सुरू असल्यानं बेननं तिला हातानेच हटवण्याचा प्रयत्नही केला. याच दरम्यान त्यांचा या महिलेच्या वक्षस्थळाला चुकून हात लागला. त्यामुळे खवळलेल्या या महिलेने बेनच्या कानशिलात लगावली आणि निघून गेली.

त्यानंतर बेनने टि्वटरवर त्याबद्दल खेदही व्यक्त केला. ‘या मुलाखतीत व्यत्यय आल्याबद्दल वाईट वाटतं. मी कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून प्रयत्न केला होता. पण आम्ही लाइव्ह कार्यक्रमात होतो. जे झाले ते अनावधानाने झाले,’ असं बेन यांनी म्हटलं आहे. त्यानंतर हा व्हिडिओ अनेक लोकांनी इंटरनेटवर शेअर केला. सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी बेनची खिल्ली उडवायला सुरूवात केली आहे. तर काही नेटकरी बेन यांचे समर्थनही करताना दिसत आहेत.

महाराष्ट्र टाइम्सची बातमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here