रॉयल कार्बन कंपनीत स्फोट नऊ कामगार जखमी

0
731

खालापूर : खालापूर तालुक्याच्या रसायनी पाताळगंगा येथील एमआयडीसी विभागातील वानिवली येथे पूर्वाश्रमीच्या हानील हिरा कंपनीच्या आवारात नव्याने सुरू करण्यात आलेल्या रॉयल कार्बन ब्लक या कंपनीत स्फोट होऊन नऊ कामगार जखमी झाले. यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. 

फर्नेस ऑईलची निर्मिती करणार्‍या या कंपनीत मंगळवारी   मशिनरीची साफसफाई सुरु असताना गॅस पाईप लाईनमधील शिल्लक गॅस बाहेर पडून स्फोट झाल्याने आग लागली. ही आग इतकी मोठी होती की त्यात नऊ कामगार जखमी झाले आहेत. यातील काहींवर    कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु तर काहींवर ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

या कारखान्यात यापूर्वीही आगीच्या घटना घडल्या आहेत. या स्फोटाबाबत चौकशी सुरू असून काही त्रुटी आढळल्यास कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here